Maharashtra Assembly Winter Session 2023: विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला (Maharashtra Assembly Winter Session) आजपासून नागपुरातून (Nagpur) सुरुवात होणार आहे. आजपासून पुढचे 10 दिवस महाराष्ट्राची (Maharashtra News) उपराजधानी नागपुरातलं वातावरण तापणार आहे. पुढचे 10 दिवस नागपूर राजकीय घडामोडींचं केंद्र असेल. या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अनेक मुद्द्यांवरुन जुंपण्याची शक्यता आहे.


मराठा आरक्षण, अवकाळीमुळे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान, गेल्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रात झालेल्या ड्रग्ज कारवाया, ड्रग्जचे कारखाने, आरोग्य विभागातील कथित घोटाळ्याचे आरोप या सर्व विषयांवर अधिवेशनात (Winter Assembly Session 2023) चर्चा होण्याची शक्यता आहे. या मुद्द्यांवरुन विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता आहे. दरम्यान, अवकाळीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकार काही घोषणा करतं का? आणि मराठा आरक्षणासंदर्भात सरकार काही निर्णय घेतं का? याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. 


कसं असेल पहिल्या दिवसाचं कामकाज? 



  • सुरुवातीला अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवले जातील 

  •  महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर अध्यादेश 2023 (दुसरी सुधारणा) (वित्त विभाग)

  •  महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ सुधारणा विधेयक 2023( उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग) 

  •  महाराष्ट्र वेश्म मालकी सुधारणा विधेयक 2023(गृहनिर्माण विभाग) 

  • सन 2023-24 च्या पुरवण्या मागण्या सादर केल्या जातील. - शासकिय कामकाज 

  • त्यांनंतर शोकप्रस्ताव सादर केला जाईल


सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी विरोधकांची रणनिती 


राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनास  आजपासून  नागपुरात सुरुवात होणार आहे. आगामी निवडणुका (Lok Sabha Election 2024) डोळ्यासमोर ठेवून मोठ्या घोषणांची शक्यता आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने येण्याची चिन्हे आहेत. या हिवाळी अधिवेशनात शिवसेना ठाकरे गट राज्य सरकारला घेरण्याच्या तयारीत आहे. उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या सर्व आमदारांना अधिवेशनासाठी विशेष सूचना दिल्या आहेत. सत्ताधारी त्यांना कसं उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. उद्धव ठाकरेंनी दिल्यात पक्षाच्या सर्व आमदारांना अधिवेशनासाठी विशेष सूचना दिल्या आहेत. अधिवेशनात शेतकऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने उपस्थित केले जाणार आहे.  राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे अधिवेशनामध्ये सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर ठाकरे गट आपली ठाम भूमिका मांडणार आहे. शेतकऱ्यांचा झालेले नुकसान राज्य सरकारच्या निदर्शनास आणून दिले जाणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या पीक विमा संदर्भात सरकार प्रश्न उपस्थित केले जाणार आहेत.


विरोधकांचा चहापानावर बहिष्कार, फडणवीसांकडून त्यांना पान सुपारी 


विधामंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून (7 डिसेंबर) सुरुवात होत आहे. त्यानिमीत्तानं सत्ताधारी आणि विरोधक नागपूरमध्ये (Nagpur) पोहोचले आहेत. दरम्यान, काल (बुधवारी) चहापानाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमावार विरोधकांनी बहिष्कार घातला. याबबातची माहिती विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली. चहापानानंतर पार पडलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकला. विरोधकांसाठी आता सुपारी पान ठेवायला हवं. विरोधकांना विदर्भ मराठवाड्यासाशी काहीही देणं घेणं नाही हे त्यांच्या भूमिकेवरून दिसतं, असं फडणवीस म्हणाले. विरोधी पक्षांच्या दुपारच्या पत्रकार परिषदेत काही नेते झोपले होते, जसे ते तीन राज्यात झोपले, अशी कोपरखळी फडणवीसांनी लगावली.