नवी दिल्ली : नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा शपथ घेणार असून रविवारी संध्याकाळी 7.15 वाजता त्यांचा शपथविधी होणार आहे. नरेंद्र मोदींसोबत जवळपास एकूण 52 ते 55 मंत्री (Narendra Modi Cabinet) शपथ घेऊ शकतात. त्यामध्ये 19 ते 22 कॅबिनेट मंत्री आणि सुमारे 33 ते 35 राज्यमंत्री शपथ घेऊ शकतात अशी माहिती आहे. एनडीए आघाडीतील टीडीपी, जेडीयू, एलजेपीसह आरएलडी, जनसेना, जेडीएस आणि अपना एनडीएचे घटक म्हणून सरकारमध्ये सामील होऊ शकतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टीडीपीला कॅबिनेट, दोन राज्यमंत्री मिळू शकतात. तर जेडीयूला कॅबिनेट आणि राज्यमंत्रीपद मिळू शकते. 


शिवसेना, एलजेपी, आरएलडी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी एक मंत्री सरकारमध्ये सामील होणार असल्याची माहिती आहे. मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात जातीपेक्षा प्रादेशिक समतोलावर भर दिला जाणार आहे. मंत्रिमंडळात उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम भागातल्या खासदारांना संधी मिळणार आहे. मंत्र्यांची निवड करताना त्यांचा अनुभव आणि शिक्षणही विचारात घेतले जात आहे.


एनडीएमध्ये भाजपनंतर चंद्राबाबूंच्या तेलुगू देसम आणि नितीशकुमारांच्या जेडीयूचं महत्त्व वाढलं आहे. त्यामुळे तेलुगू देसमला 4, जेडीयूला 4, लोकजनशक्ती पार्टीला 2 मंत्रिपदं मिळू शकतात. तेलुगू देसम आणि जेडीयू अर्थमंत्रालयासह सभापतीपदाची मागणी करत असल्याचं समजतंय. मात्र संरक्षण, अर्थ, गृह आणि परराष्ट्र मंत्रालय भाजप स्वत:कडे ठेवणार असल्याची माहिती आहे.


नरेंद्र मोदींच्या सरकारचे संभाव्य चेहरे 


उत्तर प्रदेश


राजनाथ सिंह
जितिन प्रसाद
एसपी सिंग बघेल
पंकज चौधरी


गुजरात


अमित शहा
मनसुख मांडविया


मध्य प्रदेश 


ज्योतिरादित्य सिंधिया
शिवराज सिंह चौहान


हरियाणा


राव इंद्रजीत
कृष्णपाल गुर्जर
मनोहर लाल खट्टर


राजस्थान


अर्जुन मेघवाल
भूपेंद्र यादव


महाराष्ट्र


नितीन गडकरी
पियुष गोयल
नारायण राणे


ओडिशा


वैजयंत पांडा,
अपराजिता सारंगी


या नावांचीही चर्चा 



  • एस जयशंकर

  • जेपी नड्डा

  • डॉ जितेंद्र सिंग

  • अश्विनी वैष्णव

  • शंतनू ठाकूर,

  • सुरेश गोपी,

  • विप्लव देब,

  • सर्बानंद सोनेवाल,

  • हरदीप पुरी,

  • तापीर गाव,

  • संजय बंडी/जी किशन रेड्डी,

  • प्रल्हाद जोशी,

  • शोभा करंदळे,

  • पीसी मोहन,

  • राजीव चंद्रशेखर


मित्रपक्षांचे हे नेते मंत्री होऊ शकतात


RLD - जयंत चौधरी


JDU-  लल्लन सिंग किंवा संजय झा, रामनाथ ठाकूर


शिवसेना - प्रतापराव जाधव


लोजप - चिराग पासवान


जेडीएस - कुमार स्वामी


टीडीपी - राम मोहन नायडू, के रवींद्रन


राष्ट्रवादी - प्रफुल्ल पटेल


अपना दल - अनुप्रिया पटेल


आरपीआय - रामदास आठवले


ही बातमी वाचा: