Nanded: राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये सध्या चांगलंच वाद झाल्याचा पाहायला मिळतंय. मिटकरी काल कुठल्या बिळात लपले होते? असा सवाल करत मनसेचे सरचिटणीस रणजीत शिरोळे यांनी हिम्मत असेल तर मनसे नेत्याने समोर येऊन दोन हात करावे या अमोल मिटकरी यांच्या आव्हानाला प्रत्युत्तर दिलंय. अकोल्याच्या शासकीय विश्रामगृह बाहेर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांची कार मनसे कार्यकर्त्यांनी फोडल्यानंतर काल मोठा राडा झाला. यानंतर हिम्मत असेल मनसेच्या कुठल्याही नेत्याने समोर येऊन दोन हात करावे असे आव्हान अमोल मिटकरी यांनी केलं होतं यावर मनसेचे सरचिटणीस रणजीत शिरोळे यांनी उत्तर दिलंय.


अकोल्यातली शासकीय विश्रामगृहाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांची कार मनसे कार्यकर्त्यांनी फोडल्यानंतर येथे चांगलाच राडा झाला. अकोल्यातील मनसेच्या जिल्हाध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांनी कुंड्या व दगडाने अमोल मिटकरी यांच्या कारच्य काचा फोडल्या. त्यानंतर, आमदार मिटकरी (Amol Mitkari) यांनी संताप व्यक्त करत मला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला.


मिटकरी काल कुठल्या बिळात लपले होते?


मिटकरी काल कुठल्या बिळात लपले होते असा सवाल करत शिरोळे म्हणाले, अमोल मिटकरी यांच्यासोबत काल काय झालं होतं हे त्यांनी पहावे. काल मिटकरी समोर आले असते तर मनसे कार्यकर्ते काय आहेत हे त्यांना कालच कळालं असतं. नांदेड मधून त्यांनी अमोल मिटकरी यांना प्रत्युत्तर दिले आहे.


मनसे पदाधिकाऱ्यांना जामीन; तिघांची सुटका


अमोल मिटकरी आणि मनसेच्या राडा प्रकरणातील तीन प्रमुख आरोपींना अकोला न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. जामीन मंजूर झालेल्यांमध्ये मुख्य आरोपी आणि मनसे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष सौरभ भगत आणि दिपक बोडखे यांचा समावेश आहे. याप्रकरणी एकूण 13 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यापैकी, 3 आरोपींचा 24 तासांच्या आत जामीन मंजूर झाला आहे. अकोल्याच्या शासकीय  विश्रामगृहातील राडा प्रकरणी झाले होते 13 लोकांवर सिव्हील लाईन पोलिसांत गुन्हे दाखल़. त्यातील आरोपींपैकी जय मालोकार यांचा काल हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला होता. आता, उर्वरीत 9 आरोपींनीही अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे.


त्यामुळे सुरू झाला वाद


राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर पुण्यातील पूरपरिस्थितीवरून टीका केली होती. त्यानंतर त्याला राष्ट्रवादीचे आमदार आणि प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर देत राज ठाकरे यांच्यावर टीका केली. त्यानंतर मनसे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आणि त्यांनी अकोल्यात मिटकरींची गाडी फोडली. 


हेही वाचा:


अमोल मिटकरींची गाडी काल दुपारी फोडली, आज दुपारी मनसे पदाधिकाऱ्यांना जामीन; तिघांची सुटका