Nanded: राज्यात सध्या विधानसभेचे वारे वाहू लागले आहेत. प्रत्येक पक्षाने योग्य त्या उमेदवारासाठी राज्यात बैठका घेण्यास सुरुवात केली असून राजकीय घटनांना वेग आलाय. दरम्यान माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांची सून डॉ. मीनल खतगावकर यांनी निवडणुकीपूर्वीच भाजपला बंड करण्याचा इशारा दिलाय. दोन वेळा पक्षादेश मानला, आता संधी नाही मिळाली तर अपक्ष लढण्याची तयारी त्यांनी दर्शवलीय.
नांदेड जिल्ह्यातील नायगाव मतदारसंघातून डॉक्टर मीनल खतगावकर इच्छुक आहेत. नायगाव मध्ये भाजपचे विद्यमान आमदार राजेश पवार असून याच मतदारसंघातून त्या इच्छुक असल्याने भाजपकडून आता नक्की कोणाला संधी मिळते हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.
विधानसभेच्या निवडणुकीच्या आधीच बंडाचा इशारा
राज्यात सध्या विधानसभा निवडणुका अवघ्या दोन ते तीन महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. दरम्यान, माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांची स्नुषा मीनल खतगावकर या नांदेड जिल्ह्यातील नायगाव मतदारसंघातून विधानसभेसाठी इच्छुक आहेत. पण 2019 मध्ये विधानसभेला आणि 2024 मध्ये नांदेड लोकसभेसाठी इच्छुक होत्या. दोन्ही वेळा त्यांना माघार घ्यावी लागल्याने आता पक्षाकडून संधी मिळाली नाही तर अपक्ष लढण्याची तयारी त्यांनी दाखवलीय. अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर नांदेड लोकसभा मतदारसंघातील समीकरणे हे पूर्णपणे बदलले आहे.
काय म्हणाल्या मीनल खतगावकर?
भाजपने तिकीट दिलं नाही तरी लढणार का असा प्रश्न विचारला असता बिलकुल असे उत्तर त्यांनी दिलं. त्या म्हणाल्या, दोन वेळा आम्हाला माघार घ्यावी लागली. 2019 आणि 2024 च्या लोकसभेत पक्षादेश आम्ही मान्य केला. परंतु आता जर पक्षाकडून संधी मिळाली नाही तर अपक्ष लढण्याची कार्यकर्त्यांची भूमिका आहे. आणि ती भूमिका मला मान्य आहे असं डॉक्टर मीनल खतगावकर म्हणाल्या.
अमित शहांची काही महिन्यांपूर्वी घेतली होती भेट
मीनल खतगावकर यांनी अमित शाहांची काही महिन्यांपूर्वी गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली होती. नांदेड लोकसभेसाठी मीनल खतगावकर इच्छा दाखवली होती. आगामी काळात नांदेड लोकसभा मतदारसंघात काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाच ठरतात. त्यामुळे या मतदारसंघात विद्यमान खासदार यांना उमेदवारी दिली जाणार की मीनल खतगावकर यांचा विचार केला जाणार हे पाहणं महत्त्वाच आहे.
हेही वाचा