Nana Patole on Tanaji Sawant, भंडारा : सत्ताधाऱ्यांना माज आहे. त्यामुळेच हे शेतकऱ्यांना आतंकवादी, खलिस्तानी म्हणतात आहे. अन्नदात्यांचा हे अपमान करीत आहेत. अन्नदात्याचा अपमान करण्याचा अधिकार यांना कोणी दिला. यांना अन्नदात्याचा नांगर माहित नाही. ज्यावेळी अन्नदाता नांगर फिरवेल, त्यावेळी हेच अन्नदात्याच्या पायाशी पाहायला आपल्याला मिळेल. त्यामुळे या भ्रष्टाचारी आणि संवेदनशून्य नेत्यांनी अन्नदात्यांच्या विरोधात बोलण्यापूर्वी त्यांनी आपली इमेज सांभाळली पाहिजे, एवढीच सूचना मी यांना करतोय, असा टोला नाना पटोले यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना लगावला. तानाजी सावंत यांनी शेतकऱ्यांना औकातीत राहुल बोला अशी दमदाटी केली, यावर नाना पटोले यांनी भंडाऱ्यात बोलत असताना जोरदार हल्लाबोल केला. 


ज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं पाहिजे


नाना पटोले म्हणाले, मी काँग्रेस पक्षाचा प्रमुख या नात्यानं राज्यात महाविकास आघाडी सत्तेत आली पाहिजे,यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. जन भावना, पक्षांच्या नेत्यांच्या भावना असतील. प्रत्येकाच्या भावना वेगळ्या असतात. पण, माझा प्रयत्न आहे की, राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं पाहिजे, त्यासाठी आमचा प्रयत्न सुरू असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केली. काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून नाना पटोले यांच्याकडं पाहिलं जात असल्याच्या प्रश्नावर नाना पटोले यांनी भाष्य केलं. 


बहिणीचा विरोध करून हाच सुधीर मुनगंटीवार उमेदवार म्हणून उभा झाला


पुढे बोलताना नाना पटोले म्हणाले, ह्यांच्याजवळ आता काहीच बोलायला राहिलेलं नाही. त्या बहिणीचा विरोध करून हाच सुधीर मुनगंटीवार उमेदवार म्हणून उभा झाला. यांना बहिणीवर बोलायचा अधिकार नाही. पण लाडक्या बहिणीला दीड हजार रुपये देत असताना, खिशाखिशातून दहा हजार रुपये काढतंय ना. लाईटची बिल वाढवली, महागाई वाढवली, मुलाच्या शिक्षणाच्या फी वाढवल्यात, बेरोजगारी करून ठेवलीय. या सगळ्या गोष्टी असताना दीड हजार रुपये दिल्यानं प्रश्न सुटणार नाही. लाडक्या बहिणीचा संसार सुखानं चालला पाहिजे. तिने राबराब करून आपल्या मुलाबाळाला शिकवलं पाहिजे. त्याच्या हाताला कामाच्या बद्दल का बोलत नाही. शेतकऱ्यांबद्दल तर काहीच नाही. कुठल्या बहिणीचं बोलताय, मुनगंटीवाराला तर बिलकुल बोलायचा अधिकार नाही. आमच्या ताईंच्या विरोधात उभा झाला. त्याला दणकावून पाडलं. त्याच्या मतदार संघ त्याच्या जो, विधानसभा तिथेही सुपडा साफ झाला. त्यामुळे मनगंटीवारांचं फार काही तुम्ही सिरीयस घेऊ नका. असा खोचक टोलाही नाना पटोले यांनी सुधीर मुनगंटीवार यांना लगावला.


इतर महत्वाच्या बातम्या 


'माझं तुझ्यावर प्रेम आहे, लांब फिरायला येशील का?' म्हणत शेजाऱ्याने विनयभंग केला, तरुणीने हाताची नस कापली