रायगड : रायगडमधील एका तरुणीने शेजाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. महाड एमआयडीसी परिसरातील धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. तरुणीने हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, सध्या तरुणीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर महाडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 


लांब फिरायला येशिल का ? असे बोलून शेजाऱ्याने तरुणीचा विनयभंग 


माझे तुझ्यावर प्रेम आहे, लांब फिरायला येशिल का ? असे बोलून शेजाऱ्याने तरुणीचा विनयभंग केला. त्यानंतर तरुणीने आत्महत्येचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती आहे. तरुणीच्या तक्रारीनंतर आरोपींविरोधात  तक्रार दाखल दाखल करण्यात आली आहे. संदिप चव्हाण, रोहिदास चव्हाण अशी आरोपींची नावे समोर आली आहेत. महाड MIDC पोलिसांकडून घटनेचा अधिक तपास सुरू आहे. 


तू मला आवडतेस म्हणत तरुणीला प्रपोज करण्याचा प्रयत्न नागरिकांनी दिला चोप 


मुलीला प्रपोज करणं, नवी मुंबई येथील कळंबोलीत रोड रोमिओला चांगलच अंगलट आलं आहे. 'तू मला आवडतेस...', असं म्हणत तरुणाने मुलीला प्रपोज केलं. मात्र,त्यानंतर नागरिकांनी रोड रोमिओला चांगलाच चोप दिलाय. शिवाय, अल्पवयीन मुलीची छेड काढल्याने पोलिसांनी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. नवी मुंबईतील (Mumbai Crime) कळंबोलीमध्ये हा प्रकार घडलाय. 


तू मला आवडते, पळून जाऊन लग्न करू' रिक्षावाल्याकडून विद्यार्थीनीचा विनयभंग 


पुण्यातील एका रिक्षाचालकाने शाळकरी मुलीचा विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय.  रिक्षा चालवत असताना पुढे आरशात पाहत असतानाच  तू मला आवडते, पळून जाऊन लग्न करू म्हणत रिक्षाचालकाने शाळकरी मुलीचा विनयभंग केल्याचा धक्कादाय प्रकार समोर आलाय. या घटनेनंतर पालकांनी संताप व्यक्त केला आहे. ही घटना पर्वती परिसरातील जनता वसाहत परिसरात घडलीये. याप्रकरणी रिक्षाचालका विरुद्ध पर्वती पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत मुलीच्या आईने पर्वती पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. दरम्यान, सततच्या महिल्या अत्याचाऱ्यांच्या घटनांमुळे संपूर्ण महाराष्ट्रातून संताप व्यक्त करण्यात येतोय. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Kolkata Rape Case: कोलकाता डॉक्टर बलात्कार-हत्या प्रकरणातील आरोपी तुरुंगातील चपाती-भाजी खाऊन वैतागला; अंडी आणि चाऊमीनची केली मागणी अन्...


Video : स्टॉकहोम सिंड्रोम म्हणावं की प्रेमाची जादू, हरवलेला चिमुकला 14 महिन्यांनी सापडला पण किडनॅपरला सोडून जाताना रडायला लागला


Palghar Crime : आई-मुलीचा बंद पेटीत तर वडिलांचा बाथरूममध्ये कुजलेला मृतदेह, हत्या झाल्याचा संशय; नेहरोलीमधील धक्कादायक घटना