Nana Patole on Pm Narendra Modi: काँग्रेसने जर देशाची वाईट अवस्था केली असेल तर, नरेंद्र मोदींनी आता एक सांगायला पाहीजे की, तुम्ही आता नऊ वर्षापासून जो देश चालवित आहात. तो काँग्रेसने उभे केलं ते विकून देश चालवित असल्याची घणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे. त्यामुळे मोदींचे भाषण ते सर्व थोतांड असून देशाची संविधानिक व्यवस्थेला बरबाद केल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. पंतप्रधान मोंदी यांनी लोकसभेत दिलेल्या भाषणावर प्रत्युत्तर देतांना ते असं म्हणाले आहेत.
Nana Patole: भाजपाने ईडीचा राजकीय वापर केला : पटोले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईडीने केलेल्या कार्यवाहीबाबत त्यांनी ईडीचे आभार मानले. यावर बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टिकास्र सोडताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईडीचा राजकीय वापर केला आहे. जेवढे काही गुन्हे दाखल केलेत त्यातील एकतरी गुन्हा सिद्ध झाला आहे का? न्यायालयाने त्यांच्यावर ताशेरे ओढले आहेत. मोदी सरकारने ईडीचा राजकीय वापर केल्याचा गंभीर आरोप नाना पटोले यांनी केला आहे. मोदी यांनी इडीचे जे आभार मानले, त्यातून त्यांचा फायदा झाला असावा. त्याचा दुरपयोग करण्याचा काम त्यांनी केला असावा, त्याचा आम्ही निषेध करीत असल्याचे नाना पटोले म्हणाले.
Nana Patole: त्यांची नुरा कुस्ती जनता बघत आहे : नाना पटोले
एकीकडे प्रफुल्ल पटेल यांच्या मुंबईतील सी.जे.हाऊसवर ईडीने कारवाई केली आहे. तर दुसरीकडे प्रफुल्ल पटेल यांच्या गोंदियात होत असलेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजेरी लावणार असल्याने त्यावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, जनतेचे प्रश्न घेऊन लढणं आणि त्यांची जी नुरा कुस्ती सुरू आहे. हे जनतेला माहीत आहे. त्यावर मी प्रतिक्रिया देणार नाही, असे म्हणत अधिक बोलणं टळलं.
Nana Patole: कुणीही काँग्रेस पक्षाला घरचा पक्ष समजू नये : नाना पटोले
सत्यजीत तांबे यांच्या कारवाई प्रकरणी आमदार सुनिल केदार यांनी अप्रत्यक्षपणे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना नाना पटोले यांनी कुणीही काँग्रेस पक्षाला स्वतःच्या घरचा पक्ष समजू नये. नाना पटोले प्रदेशाध्यक्ष असले तरीही त्यांनीही काँग्रेस पक्षाला घरचा पक्ष समजू नये. काँग्रेस हा विचारांचा तसेच कार्यकर्त्यांचा पक्ष असल्याचे नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले.