Maharashtra Nagarparishad Election Result: ज्या अर्थी एक्झिट पोल (Exit Poll) अखेरचे फेजचे मतदान संपेपर्यंत जाहीर केले जात नाही, कारण मतदानाचे सर्व फेज फ्री अँड फेयर (Free and Fair Election) राहिले पाहिजे, त्या अर्थी नगरपरिषदेच्या निवडणुकीचा (Nagarparishad Election Result) 2 डिसेंबरचा टप्पा पार पडल्यानंतर, 20 डिसेंबरचे मतदान व्हायचे असताना, 3 डिसेंबरला मतमोजणी करून निकाल कसे घोषित करू शकता? असा सवाल करत राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या निकालाबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महत्त्वाचा निकाल दिला आहे.
High Court Nagpur : न्यायाधीश नेमकं काय म्हणाले?
आपण याला एक निवडणूक म्हणून मानले पाहिजे. लोकसभेत 1 फेज झाल्यानंतर निकाल जाहीर करता की अखेरच्या फेजपर्यंत थांबता? मग इथे असे का? असा प्रश्नही न्यायालयाने केला आहे. उलट राज्य निवडणूक आयोगाने हे खुद्द करायला हवे होते.असेही निरीक्षण नागपूर खंडापीठाने नोंदवले आहे. परिणामी आता सर्व मतमोजणी 21डिसेंबरला घ्या. असा महत्वाचा निर्णय न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे आता एकत्रितरित्या मतमोजणी केली जाणार आहे. काही नगरपरिषदांबाबत न्यायालयीन प्रक्रिया प्रलंबित असल्याने राज्यातील जवळपास 20 नगरपरिषदांची मतदान प्रक्रिया पुढे ढकलली होती. ही निवडणूक 20 डिसेंबरला होणार होती.
त्यामुळे सर्व निवडणुकांचे निकाल एकाच दिवशी जाहीर व्हावेत. अन्यथा 20 नगरपरिषदांच्या निकालावर प्रभाव पडू शकतो, अशी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. याबाबतचा सगळा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचा निकाल एकाच दिवशी म्हणजे 21 डिसेंबरला जाहीर करण्याचे निर्देश दिले आहेत.
Nagarparishad Election Result: निकालाची तारीख पुढे गेल्यामुळे काय परिणाम होणार?
-प्रशासनाला ईव्हीएम सुरक्षित ठेवण्यासाठी चे स्ट्रॉंग रूम आणि मतमोजणी केंद्र 21 नोव्हेंबर पर्यंत राखीव ठेवावे लागतील..-ही निवडणूक जवळपास 280 ठिकाणांवर होत असल्याने आणि प्रत्येकाची मतमोजणी स्वतंत्र ठिकाणी वेगवेगळ्या शहरात असल्याने जवळपास 280 पेक्षा जास्त मतमोजणी केंद्र आणि स्ट्रॉंग रूम 21 नोव्हेंबर पर्यंत राखीव ठेवावे लागेल..-शिवाय सर्व स्ट्रॉंग रूम मध्ये तेवढे दिवस ईव्हीएम सुरक्षित ठेवण्यासाठी चा पोलीस बंदोबस्त ठेवावा लागेल..-स्ट्रॉंग रूम मध्ये ईव्हीएम असताना निवडणूक निर्णय अधिकारी तसेच निवडणूक प्रक्रियेतील कर्मचाऱ्यांना रोज स्ट्रॉंग रूम मध्ये जाऊन पाहणी करणे आणि स्वाक्षरी करणे बंधनकारक असते.. ती प्रक्रिया रोज 21 नोव्हेंबर पर्यंत पार पाडावी लागेल.-विधानसभेला साधारणपणे 288 ठिकाणी मतमोजणी असते, जवळपास तेवढेच मतमोजणी ठिकाण नगर परिषद निवडणुकीत आहेत.. मात्र, लक्षात ठेवण्यासारखी बाब म्हणजे विधानसभेची मतमोजणी वोटिंग नंतर लगेच एक किंवा दोन दिवसात होते..-म्हणजे आज मतमोजणी समोर ढकलली गेली, तर विधानसभा निवडणूक सुमारे तीन आठवडे सांभाळावी एवढी प्रशासन आणि पोलिसांची यंत्रणा कामी लागेल.
आणखी वाचा