Sanjay Raut on Eknath Shinde: राज्यात सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या (Local Body Election) पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विशेषत: मालवण नगर परिषद तसेच नगर पंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने आरोप–प्रत्यारोपांची मालिका जोर धरताना दिसत आहे. राज्यात सत्तेत एकत्र असलेल्या महायुतीतील मित्रपक्षांनीच एकमेकांवर केलेल्या आरोपांमुळे मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेना (Shiv Sena) शिंदे गटाचे आमदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी भाजपवर (BJP) पैशांचे वाटप केल्याचा आरोप केला असून एका भाजप कार्यकर्त्याच्या घरावर त्यांनी धाडही टाकली होती. आता या प्रकरणात शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनी उडी घेतली आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मालवणच्या दौऱ्यावर “पैशांच्या बॅगा” घेऊन आल्याचा दावा केला आहे. वैभव नाईक यांनी यासंदर्भात एकनाथ शिंदे यांचा व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर केला आहे. तसेच वैभव नाईक यांनी निलेश राणे यांच्यावरही मतदारांना पैसे वाटल्याचा गंभीर आरोप केलाय. आता यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केलाय.
Sanjay Raut on Eknath Shinde: नेमकं काय म्हणाले संजय राऊत?
संजय राऊत यांनी एक्सवर एकनाथ शिंदे यांचा व्हिडीओ शेअर करत म्हटले आहे की, शिंदे मालवणात आले. येताना बॅगेतून काय आणले? मालवणात भाजपाच्या थैल्यांना बॅगेने उत्तर! या आधी नाशिकमध्ये ही बॅगा उतरल्याच होत्या. लोकशाहीची ऐशी की तैशी? जय महाराष्ट्र, असे म्हणत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधलाय.
Vaibhav Naik Post: वैभव नाईकांची पोस्ट काय?
- एकनाथ शिंदेंनी मालवणात आणल्या पैशांच्या बॅगा: व्हिडीओ वायरल
- भाजपवर आरोप करणाऱ्या निलेश राणेंकडूनही मालवणात पैशांचे वाटप
- माजी आमदार वैभव नाईक यांचा आरोप
एकीकडे निलेश राणेंनी भाजप पक्षावर मतदारांना पैसे वाटल्याचे आरोप केले परंतु निलेश राणे आणि शिंदे- शिवसेना देखील धुतल्या तांदळासारखी नाही. परवा एकनाथ शिंदे मालवणात आले तेव्हा त्यांच्या मागून त्यांचे बॉडीगार्ड पैशाच्या बॅगा घेऊन कॅमेरा पासून लपण्यासाठी धावत आहेत हे वरील व्हिडीओत स्पष्ट दिसून येत आहे. हेच पैसे काल निलेश राणेंनी मालवण मधील मतदारांना वाटले आहेत. राज्यात सत्तेत राहून जनतेच्या पैशात भ्रष्टाचार करून मिळविलेला हा पैसा आहे. पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हेच धोरण सध्या शिंदे- शिवसेनेकडून प्रत्येक निवडणुकीत राबविले जात आहे. असा आरोप माजी आमदार वैभव नाईक यांनी केला आहे. हा भ्रष्टाचार रोखण्यासाठी मालवणच्या जनतेने विचार पूर्वक मतदान करावे असे आवाहन वैभव नाईक यांनी मालवणच्या जनतेला केले आहे.
आणखी वाचा