Maharashtra Election 2025: महाराष्ट्रातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नगरपालिका निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. राज्यातील 264 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी संपूर्ण मतदान यंत्रणा सज्ज झाली आहे. तसेच मतदान केंद्रांवर पोलिसांमार्फत पुरेशा बंदोबस्ताची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. बहुतांशठिकाणी सकाळी 7: 30 वाजतापासून मतदानास सुरुवात झालीअसूनमतदारांनी मतदान केंद्रावरगर्दीकेल्याचेबघायलामिळालेआहे. दरम्यान सांयकाळी 5:30 पर्यंत मतदानाची वेळ असणारआहे. तर या निवडणुकांची मतमोजणी लगेच दुसऱ्या दिवशी बुधवारी होणार आहे. असंसगळंअसतानाराज्यातीलअनेकमतदानकेंद्रावरप्रशासनाचासावळाकारभारबघायला मिळालाआहे. अनेकठिकाणी नगरपरिषद निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात होताच EVM मशीन बंद पडल्याचेबघायलामिळालेआहे. त्याचाफटकाआतामतदारांनाआणिएकंदरीतप्रक्रियेवरहोणारआहे.
Mohol : मोहोळच्या नेताजी प्राशाळेत EVM मशीनमध्ये तांत्रिक बिघाड
सोलापूरजिल्ह्यातील मोहोळ नगरपरिषद येथील नेताजी प्राशाळेत EVM मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मागील अर्धा तासापासून मतदान प्रक्रिया बंद आहे. सध्या कर्मचाऱ्याकडून मतदान मशीन सुरु करण्याचे प्रयत्न सुरूय. मात्रयातांत्रिकबिघाडाचाफटकामतदारांनासहनकरावालागतोआहे. परिणामी लोकं मशीन सुरु होण्यासाठी प्रतीक्षा करत रांगेत थांबलेत.
Mohol Politics : आमदार रमेश कदम यांनी भाजपवर आरोप, सुशील क्षीरसागरांच प्रत्युत्तर
सोलापुरातील मोहोळमध्ये आणखी एका मतदान केंद्रावरील मशीन बंद पडली आहे. मोहोळ शहरातील आठवडी बाजार मतदान केंद्रावरील मशीन बंद पडली आहे. मशीन बंद पडल्यावरुन आता माजी आमदार रमेश कदम यांनी भाजपवर आरोप केलाय. मतदान केंद्रावरील वोटिंगमशीन वर केवळ भाजप चिन्हाचे बटन दाबले जात असल्याचा रमेश कदमांनी आरोप केलाय. तर विरोधकांना पराभव दिसत असल्याने त्यांच्या पायाखालीची वाळू सरकली, असे प्रत्युत्तर भाजप उमेदवार सुशील क्षीरसागर यांनीदिलंय. प्रभाग क्रमांक 2 मधील 1 नंबर बुथवरील मशीन 1 तासापासून बंद आहे. भाजप उमेदवार शितल क्षीरसागर आणि माजी आमदार रमेश कदम मतदान केंद्रावर दाखल झालेअसून मशीन बंद पडल्या बाबत अधिकाऱ्यांना जाब विचारत आहेत.
चिपळूण, बुलढाण्यातही EVM मशीन बंद पडल्या, मतदार खोळंबलेत
बुलढाण्यातील खामगाव येथील प्रभाग क्रमांक 8 येथील मतदान केंद्र क्रमांक आठ आणि दोनमध्ये मशीनमध्ये बिघाड झालाय. परिणामी गेल्या 35 मिनिटांपासून मतदान ठप्प झालंआहे. तर अद्यापही मतदान सुरू झालेलं नाही. त्यामुळेमतदारांनामनस्थापसहनकरावालागतोय. तरदुसरीकडे चिपळूण मध्ये देखील EVM मशीन बंद पडल्याने मतदार खोळंबलेत. खेंड मतदान केंद्रावरील EVM मशीन दोन वेळा बंद पडले आहेत. आता प्रशासनाकडून मशीन सुरू करण्यासंदर्भात हालचाली सुरू आहे. मात्र मतदार रांगेत उभे राहूनप्रतीक्षाकरतआहे.
सोलापूरजिल्ह्यातील अक्कलकोटमधील नगर परिषद मुला - मुलींची उर्दू शाळेतील देखील EVM मशीन बंद पडली आहे. मतदान केंद्र क्रमांक 9 वरील 2 नंबर खोली मधील मशीन तब्बल अर्ध्या तासापासून बंद आहे. परिणामी, सकाळच्या सत्रात मतदान करायला आलेल्या मतदारांची तारांबळ उडालीय. निवडणूक कर्मचाऱ्यांनाकडून मशीन पूर्ववत करण्यासाठी सध्याप्रयत्न सुरु आहेत.
हेही वाचा