Mumbai: राज्यात सध्या विधानसभा निवडणूकीचे सर्वच पक्षांना वेध लागले आहेत. राज्यात विभागनिहाय आढावा बैठका झाल्या. आता त्या त्या मतदारसंघातून संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरु आहे. दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी सरकारवर जोरदार निशाणा साधलाय. यांच्या 'लाडक्या खूर्ची' ला कोणी घाबरायची गरज नाही.  हे सरकार निर्लज्ज आहे. त्यांना जनता त्यांची जागा दाखवेल असेही ते म्हणालेत.


20 ऑगस्ट रोजी मुंबईत काँग्रेसची बैठक असून या सभेत काँग्रेसनेते राहूल गांधी, कॉग्रेस पक्षाध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांना कार्यक्रमात बोलवण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेसकडे  तिकीट मागणाऱ्यांची लाईन लागली आहे. हजारो अर्ज आले आहेत. असंही पटोले म्हणाले.


बटण दाबलं नाही तर योजना बंद होईल असं अजित पवार म्हणाले


'बटण दाबलं नाही तर योजना बंद होईल असे अजित पवार म्हणाले असून कालही एकजण असं बोलल्या'चं नाना पटोले यांनी दावा केला. 'यांच्या लाडक्या खूर्चीला कोणी घाबरायची गरज नाही. कोर्टानं आज त्यांना चांगलंच झापलं आहे. भूसंपादन, कर्जमाफी प्रोत्साहनाचे पैसे अजून दिले नाहीत. याला एकनाथ शिंदे सरकार जबाबदार आहे. '  असे म्हणत त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली.


महायुतीचे यंदा 100च्या आत उमेदवार; पटोलेंचा दावा


काँग्रेसकडं तिकीट मागणाऱ्यांची लाईन लागली आहे. हजारो अर्ज आले आहेत. मुख्यमंत्री पदाबाबत कुठलही चर्चा नाही. महाविकास आघाडी म्हणून आमचा चेहरा असेल, तोच घेऊन आम्ही निवडणुकीला पुढे जाऊ असं काँग्रस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले. राज्यात महायुतीचे 100 च्या आत उमेदवार निवडून आलेले असतील असा दावा त्यांनी केला.


ते आमची कॉपी करतात


महाराष्ट्र भ्रष्टाचारी राज्य म्हणून देशात प्रसिद्ध झालं आहे.राज्यात शेतकऱ्यांच्या सगळ्यात जास्त आत्महत्या झाल्यात. जिथं आमचं सरकार आहे तिथे या योजना आहेत.आमची कॉपी ते करत आहेत त्यामुळं घाबरायची काही गरज नाही.
लोकसभेला काँग्रेस सगळ्यात मोठी पार्टी बनली आहे. विधानसभेला देखील काँग्रेस सगळ्यात मोठा पक्ष बनेल, असे ते म्हणाले.


हेही वाचा:


Manoj Jarange on Chhagan Bhujbal : मनोज जरांगेंची छगन भुजबळांवर शेलक्या भाषेत टीका; म्हणाले, रस्त्यावर खुर्ची टाकून बसले तरी...