मुंबई: राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांवर ईडीचे (ED) धाड सत्र सुरू असताना, आता शिवसेनेने (Shiv Sena) ही याविरुद्ध मोर्चा उघडला आहे. आज बेकायदेशीर बांधकाम (Illegal Construction) प्रकरणी भाजप (BJP) नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांच्या घरी मुंबई महापालिका अधिकारी दाखल झाले आहेत. याआधी कंबोज यांना पालिकेने नोटीस पाठवली होती. सांताक्रूझ येथे ज्या इमारतीत त्यांचे निवासस्थान आहे, त्या इमारतीची पालिकेच्या पथकाद्वारे पाहणी करण्यात येत आहे.
बेकायदेशरी बांधकामावर चालणार हातोडा?
कंबोज यांच्या घरात पालिका पथक दाखक झाल्यानंतर आज त्यांच्या घरातील अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मोहित कंबोज यांना या संबधित नोटीस देण्यात आली होती. त्यानंतर आज पालिका अधिकारी त्यांच्या घरी पोहोचले आहेत. असं असलं तरी आज त्यांच्या घरावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही. आज फक्त त्यांनी घरात कुठे आणि किती बेकायदेशीर बांधकाम केलं आहे, याची पाहणी केली जाणार आहे. यानंतर काही दिवसांनी पालिकेकडून कारवाई केली जाऊ शकते.
मोहित कंबोज घरासोबतच त्यांच्या कार्यालयात झालेल्या अनधिकृत बांधकामांशी संबधित नोटीस ही आज त्यांना पालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी मोहित कंबोज यांना फटका बसू शकतो. एमआरडीपी या कायद्यानुसार ही कारवाई करण्यात येईल, अशी माहिती आहे. त्यांनी आपल्या घरात आणि कार्यालयाच्या बांधकामात काही बदल केली असल्यास ही कारवाई करण्यात येणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- The Kashmir Files: तर चित्रपटातून कमावलेले 150 कोटी काश्मिरी पंडितांच्या घरबांधणीसाठी द्यावे: जयंत पाटील
- Uddhav Thackeray : ईडीची थेट उद्धव ठाकरेंच्या मेव्हण्यावर कारवाई; 6.45 कोटी रुपयांच्या संपत्तीवर टाच
- ED : ईडीने टाच आणलेल्या मुख्यमंत्र्यांच्या मेव्हण्याचा निलांबरी प्रोजेक्ट काय आहे? जाणून घ्या ए टू झेड माहिती