Eknath Shinde: महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून अशा प्रकारच्या कारवाया आपण पाहत आलो आहे. या सर्व कारवाया सूडबुद्धीने केल्या जात आहेत. केंद्रीय तपास यंत्रांचा अशा प्रकारे वापर हा लोकशाहीसाठी घातक आहे. महाविकास आघाडीच्या सरकारच्या कामात अडथळे निर्माण करण्याचं, सरकार अस्थिर करण्याचं काम भाजपकडून केलं जात आहे, असं शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेव्हण्यावर ईडीने आज कारवाई केली. त्यावर आपली प्रतिक्रिया देताना ते असे म्हणाले आहेत.
शिंदे म्हणाले आहेत की, महाविकस आघाडीचे सरकार हे बहुमताचे सरकार आहे. लोकशाहीत बहुमताच्या आकड्याला खूप महत्व आहे. त्यामुळे सरकारवर याचा कुठलाही परिणाम होणार नाही. अशा कारवाईना शिवसेना घाबरत नाही, घाबरणार नाही. सरकार काम करत राहील. तसेच योग्यवेळीस उत्तर देऊ, असा इशारा ही त्यांनी नाव न घेता भाजपला दिला आहे.
एकनाथ शिंदे पुढे म्हणाल आहेत की, ''काही चुकीचे घडत असल्यास नक्कीच कारवाई करावी. मात्र राजकीय सूडबुद्धीने होत असलेली ही कारवाई करणे लोकशाहीत योग्य नाही. शिवसेना अशा कारवाईना घाबरत नाही. आम्ही आमचं काम करत राहू.'' अशा कारवाईमुळे सरकार अस्थिर होणार नाही, आम्ही आमचं काम करत आलो आहे. पुढे ही करत राहू असं ही ते म्हणाले आहेत.
दरम्यान, ई़डीने आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांच्यावर कारवाई केली आहे. पुष्पक बुलियन या कंपनीची संबंधित एका प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. जप्त केलेली ही मालमत्ता तब्बल 6.45 कोटी रुपयांची आहे.
संबधित बातम्या:
Uddhav Thackeray : ईडीची थेट उद्धव ठाकरेंच्या मेव्हण्यावर कारवाई; 6.45 कोटी रुपयांच्या संपत्तीवर टाच
ED : मी माझ्या पोरीला महाराष्ट्रात ठेवणार नाही; मुख्यमंत्र्यांच्या मेव्हण्यावर ईडीच्या कारवाईनंतर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया
न्यायालयावर दबाव असल्याने त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा नाही, उद्धव ठाकरेंच्या मेव्हण्यावरील कारवाईवर संजय राऊत यांची प्रतिक्रिया