एक्स्प्लोर

BMC Election Results 2026: भाजपने ठाकरेंच्या हातातून मुंबई हिसकावली, आता महापौर कोण होणार? समोर आली मोठी अपडेट

BMC Election Results 2026: मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजप आणि शिंदे सेनेने मोठा विजय मिळवला. त्यामुळे ठाकरे बंधूंची इतक्या वर्षांची सत्ता गेली आहे. मुंबईत महापौर कोण होणार?

Mumbai Mayor BMC Election Results 2026: मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. यामध्ये भाजपने 89 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष होण्याचा बहुमान मिळवला. तसेच मुंबई महानगरपालिकेवर (Mumbai Mahangarpalika) गेल्या 25 वर्षांपासून असलेली शिवसेना आणि ठाकरेंची सत्ता भाजप-शिंदे सेनेच्या युतीने उलथवून लावली. यंदाच्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी मुंबईचा महापौर (Mumbai Mayor) कोण होणार, याची जोरदार चर्चा रंगली होती. ठाकरे बंधूंनी मुंबईचा महापौर हा मराठी व्यक्तीच असेल, असे जाहीर केले होते. त्यामुळे सुरुवातीला मुंबईचा महापौर हिंदू होणार, असे बोलणाऱ्या भाजपला (BJP) नंतरच्या टप्प्यात मुंबईचा महापौर मराठी व्यक्तीच होईल, हे स्पष्ट करावे लागले आहे. आता भाजपने मुंबई जिंकल्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेचा महापौर कोण होणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. याबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. (Mumbai Latest news)

मुंबईचा महापौर नेमका कोण होणार, यासाठी जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, जानेवारी अखेरीस महापौर निवड होण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यात नगरविकास खाते महापौर पदासाठी सोडत काढणार आहे. महापौर सोडतीनंतर 10 दिवसांनी मुंबईचा महापौर निवडला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपने 89 आणि शिंदे सेनेने 29 जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे नैसर्गिकरित्या महापौर पदावर भाजपचा दावा आहे. मात्र, शिंदे सेनेच्या काही नेत्यांनीही मुंबईच्या महापौरपदावर दावा ठोकला आहे. मुंबई महानगरपालिकेत सत्तास्थापन करण्यासाठी 114 जागांची गरज आहे. हा आकडा भाजपला एकट्याला गाठता येणार नाही. त्यामुळे त्यांना शिंदे गटाची मदत घ्यावीच लागणार आहे. त्यामुळे शिंदे गट महापौरपदासाठी अडून बसणार का, हे बघावे लागेल.

Mumbai Mayor Election: मुंबईचा महापौर कोण होणार?

मुंबईतील अमराठी मतदारांनी भाजपला एकगठ्ठा मतदान करुन त्यांच्या विजयात मोठा वाटा उचलला आहे. मुंबईतील मराठीबहुल भागात ठाकरे बंधूंच्या जागा निवडून आल्या. मात्र, अमराठी लोकसंख्या असलेल्या भागांमधून भाजपला मोठे यश मिळाले होते. मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर आहे. त्यामुळे जगातील अन्य देशांप्रमाणे कॉस्मोपॉलिटीन मुंबईत अमराठी व्यक्ती महापौर झाल्यास गैर काय, असा युक्तिवाद काहीजणांकडून करण्यात आला होता. त्यामुळे भाजप खरोखरच मुंबईत अमराठी व्यक्तीला महापौरपदी बसवणार का, हे बघावे लागेल. महापौरपदासाठी भाजपमधील अनेक नगरसेवक इच्छूक आहेत. यापैकी कोणाची महापौरपदी वर्णी लागणार, हे बघावे लागेल.

आणखी वाचा

मुंबईतील 62 नगरसेवकांनी साथ सोडली, समोर भाजपची अजस्त्र ताकद, तरीही उद्धव ठाकरेंनी 65 जागा मिळवल्या, नेमकं काय साधलं?

महत्त्वाच्या बातम्या

Baramati News: रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
मनोज जरांगेंची लढाई आमच्याविरुद्ध नाही; छगन भुजबळाचं वक्तव्य, म्हणाले, कोण म्हणतय ओबीसी आरक्षण संपलं?
मनोज जरांगेंची लढाई आमच्याविरुद्ध नाही; छगन भुजबळाचं वक्तव्य, म्हणाले, कोण म्हणतय ओबीसी आरक्षण संपलं?
Maharashtra Live News Updates: मुंबईतील मोकळ्या जागा आणि क्रीडांगणं वाचवण्यासाठी आदित्य ठाकरेचं आज आंदोलन
Maharashtra Live News Updates: मुंबईतील मोकळ्या जागा आणि क्रीडांगणं वाचवण्यासाठी आदित्य ठाकरेचं आज आंदोलन
Baramati News: इमारतीच्या टेरेसवर कडी लावलेली; एक चप्पल वरती पडलेली; रोहित पवारांच्या पीएच्या मुलीच्या पोस्टमार्टम रिपोर्टची प्रतिक्षा, रात्री नेमकं काय घडलं?
इमारतीच्या टेरेसवर कडी लावलेली; एक चप्पल वरती पडलेली; रोहित पवारांच्या पीएच्या मुलीच्या पोस्टमार्टम रिपोर्टची प्रतिक्षा, रात्री नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले
Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Baramati News: रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
दैव बलवत्तर, दरीच्या टोकावर अडकली बस; प्रवाशांच्या खिडकीतून पटापट उड्या, सुदैवाने 40 जण बचावले
दैव बलवत्तर, दरीच्या टोकावर अडकली बस; प्रवाशांच्या खिडकीतून पटापट उड्या, सुदैवाने 40 जण बचावले
कोल्हापूर : शिरोली एमआयडीसीत प्लास्टिक स्क्रॅप यार्डला भीषण आग; तब्बल 5 ते 10 किमीवर अंतरावरून धुराचे लोट दिसू लागले
कोल्हापूर : शिरोली एमआयडीसीत प्लास्टिक स्क्रॅप यार्डला भीषण आग; तब्बल 5 ते 10 किमीवर अंतरावरून धुराचे लोट दिसू लागले
Baramati News: रोहित पवारांच्या पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांचा तपास सुरू, आत्तापर्यंत काय-काय आलं समोर?
रोहित पवारांच्या पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांचा तपास सुरू, आत्तापर्यंत काय-काय आलं समोर?
मनोज जरांगेंची लढाई आमच्याविरुद्ध नाही; छगन भुजबळाचं वक्तव्य, म्हणाले, कोण म्हणतय ओबीसी आरक्षण संपलं?
मनोज जरांगेंची लढाई आमच्याविरुद्ध नाही; छगन भुजबळाचं वक्तव्य, म्हणाले, कोण म्हणतय ओबीसी आरक्षण संपलं?
पत्नीने घरातील सीसीटीव्ही बंद केला, भावांना बोलून घेतलं, सॉफ्टवेअर इंजिनिअर पतीला बेदम मारहाण, दवाखान्यात जीव सोडला, चार महिन्यांपूर्वीच जुळ्यांना जन्म, मुलांना औषध लावण्याच्या वादात कुटुंब उद्ध्वस्त
पत्नीने घरातील सीसीटीव्ही बंद केला, भावांना बोलून घेतलं, सॉफ्टवेअर इंजिनिअर पतीला बेदम मारहाण, दवाखान्यात जीव सोडला, चार महिन्यांपूर्वीच जुळ्यांना जन्म, मुलांना औषध लावण्याच्या वादात कुटुंब उद्ध्वस्त
रामटेकमध्ये दुर्मिळ नानेटी अल्बिनो सापाचे दर्शन, पाहायला गर्दी; सर्पमित्रांकडून नैसर्गिक अधिवासात रेस्क्यू
रामटेकमध्ये दुर्मिळ नानेटी अल्बिनो सापाचे दर्शन, पाहायला गर्दी; सर्पमित्रांकडून नैसर्गिक अधिवासात रेस्क्यू
Bhuleshwarcha Raja Marathi News: नागरिक म्हणाले, खड्ड्यांमुळे भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात; आता अग्निशमन दलाने सांगितलं नेमकं कारण!
नागरिक म्हणाले, खड्ड्यांमुळे भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात; आता अग्निशमन दलाने सांगितलं नेमकं कारण!
Embed widget