मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) राज्यातील शेवटच्या टप्प्यातील 13 जागांवर मतदान होत आहे. यामध्ये मुंबईतील सहा जागांसह उत्तर महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. मुंबईमधील सहा लोकसभा मतदारसंघांसाठी आज सकाळी सात वाजल्यापासून उत्साहात मतदानास प्रारंभ झाला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. 






जास्तीत जास्त मुंबईकर मतदान करतील अशी आशा 


यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी मुंबईकरांना मतदान करण्याचे आवाहन केले. दरम्यान, राज ठाकरे यांनी मतदानानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले. मुंबईकर मतदानासाठी बाहेर पडत नाही याबाबत विचारण्यात आले असता राज यांनी सांगितले की उन्हाळ्याचे दिवस आहेत. संध्याकाळी पाचपर्यंत किती मतदान होते हे बघू. जास्तीत जास्त मुंबईकर मतदान करतील अशी आशा असल्याचे राज ठाकरे म्हणाले. 


ही निवडणूक मुंबईसाठी किती महत्त्वाची आहे? राज म्हणाले...


दरम्यान, मुंबईसाठी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेमध्ये मागण्या करणाऱ्या राज ठाकरे यांना मुंबईत मतदान होत असल्याने ही निवडणूक मुंबईसाठी किती महत्त्वाची आहे? असे विचारले असता राज ठाकरेंनी फक्त चला म्हणत एका वाक्यात विषय संपवला.






मुंबईकरांना मतदान करण्यासाठी काय आवाहन करणार? 


मुंबईकरांना मतदान करण्यासाठी काय आवाहन करणार? याबाबत त्यांना विचारण्यात आले असता त्यांनी सांगितले की घीसा पिठा वाक्य सांगतो, मतदानाचा अधिकार बजावा. तरुण आहे जे पहिल्यांदा मतदान करणार आहेत ते मतदानाला उतरतील, ज्यांच्या अशा संपल्या आहेत त्यांच्याकडून मतदानाच्या अपेक्षा करू नका, असे त्यांनी यावेळी सांगितले. 


महिला मतदार सायलेंट व्होटर ठरतील का? 


दरम्यान महिला मतदार सायलेंट व्होटर ठरतील का? याबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले की, मी काही भविष्यवेता नाही रे, मी काय ज्योतिष म्हणून बसलोय का? अशी उलट विचारणा त्यांनी केली. महिला येतील, मतदानात उतरतील असं त्यांनी सांगितलं. 


इतर महत्वाच्या बातम्या