मुंबई : मुंबईच्या (Mumbai Lok Sabha Election) भांडुपमध्ये (Bhandup) ठाकरे गटाच्या दोन कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. डमी मशिनचं प्रात्याक्षिक दाखवणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊतांनी पोलिसांना झापलं आहे.
सुनील राऊत म्हणाले, आमची भूमिका ठाम आहे. ईशान्य मुंबईच्या जनतेने ठरवले आहे संजय दिना पाटलांना दिल्लीला पाठवणार आहे.भारतीय जनता पक्ष आम्हाला प्रचंड त्रास आहे. कालपासून जास्त त्रास देत आहे. आमच्या कार्यकर्त्यांवर दबाव आणला जात आहे. आमच्या कार्यकर्त्यांना अटक केली जात आहे. आमच्या प्रमुख कार्यकर्त्यांना बोलवले जात आहे. आमच्यावर दबाव आणला जात आहे. त्यांना धमकी दिली आहे. आज सकाळी सुद्धा आमच्या कार्यकर्त्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे.
भाजपला पराभाव दिसतोय म्हणून पोलिसांवर दबाव : सुनील राऊत
सुनील राऊत म्हणाले, पोलीसांनी माझ्याशी चर्चा केली. ते म्हणाले आम्ही निवडणूक कार्यालयात बोलवून नियम समजून घेतो. जर 100 मीटरच्या बाहेर ते मार्गदर्शन करत असतील तर आम्ही त्यांना सोडून देऊ. भाजपला पराभाव दिसतोय म्हणून पोलिसांवर दबाव आहे. पोलीसांनी निष्पक्ष पद्धतीने काम केले पाहिजे.
निवडणूक आयोग हे भारतीय जनता पक्षाची शाखा : संजय राऊत
संजय राऊत म्हणाले, निवडणूक यंत्रणा, निवडणूक आयोग पूर्णपणे सत्ताधारी पक्षाच्या पकडीत आहे. तरीही आमच्यासारखे पक्ष जिद्दीने उतरले आहेत. प्रचंड पैशांचे वाटप केले जात आहे. त्यावर काही कारवाई केली जात नाही. निवडणूक आयोग हे भारतीय जनता पक्षाची शाखा म्हणून काम करत आहे. निवडणूक आयोगाची अशी कोणतीही नियमावली नाही. मार्गदर्शन करण्यासंदर्भात काही नियमावली नाही. तरीही इकडचे काही लोक हे पोलिसांवार, अधिकाऱ्यांवर दादागिरी करत आमच्या कार्यकर्त्यांना अटक केली. पोलीस त्यांना घेऊन गेली. पैसे वाटप करणाऱ्यांना अटक केली नाही. 4 जून नंतर त्यांना समजेल की, तुमचा दबाव, तुमच्या पैशाचे वाचप झुगारुन मतदान केले आहे.
कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर संजय राऊत चांगलेच आक्रमक
ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर संजय राऊत चांगलेच आक्रमक झाले. डमी मशीनवर कार्यकर्त्यंकडून मार्गदर्शन करण्यात येत होते. मात्र या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर संजय राऊतांनी या संदर्भात पोलिसांना जाब विचारला आहे.
हे ही वाचा :