छत्रपती संभाजीनगर : मागील काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील (MP Imtiyaz Jaleel) आणि अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्यात सुरु असलेले आरोप-प्रत्यारोप काही थांबता थांबत नसल्याचे चित्र आहे. 'या देशात राहायच असेल तर जय श्रीराम म्हणावेच लागेल' असे इशारा राणा यांनी एमआयएमचे प्रमुख असुदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांना दिला होता. त्यानंतर जलील विरुद्ध राणा असा संघर्ष पाहायला मिळत आहे. त्यातच आता जलील यांनी पुन्हा एकदा नवनीत राणा यांच्यावर हल्लाबोल करत जहरी टीका केली आहे.
जलील यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून दाखवण्याचे आव्हान नवनीत राणा यांनी केले होते. त्यांच्या टीकेला उत्तर देतांना जलील म्हणाले आहे की, “यु ट्यूबवर मी एक चांगली म्हण पाहिली आहे. जर एखाद्या मूर्ख व्यक्तीसोबत वाद होत असेल, तर पराभव स्वीकारला पाहिजे. माणूस कितीही चांगला असला तरी तो कुत्र्यासारखं भुंकू शकत नाही. मी याबाबत बोलत नाही. पण, ज्या प्रकारे या महिलेची भाषा आहे. मला सांगण्यात आले आहे की, नवनीत राणा या एससी प्रवर्गातून निवडून आल्या आहेत. पण त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान वाचले की नाही मला माहित नाही. त्यांना भाजपची उमेदवारी पाहिजे असल्याने त्या संविधान विसरल्या असतील. हे नथुराम सारखे लोकं आहेत, असे जलील म्हणाले आहेत.
काय आहे प्रकरण?
एमआयएम पक्षाचे प्रमुख असुदुद्दीन ओवेसी यांनी अधिवेशनादरम्यान संसदेत बोलतांना केंद्र सरकारवर जोरदार टीका केली होती. ओवेसी यांनी "बाबरी मशीद जिंदाबाद, बाबरी मशीद जिंदाबाद", असे नारेही दिले होते. दरम्यान, खासदार नवनीत राणा यांनी एमआयएमचे प्रमुख ओवेसी यांना जोरदार प्रत्युत्तर दिले होते. "तुम्हाला या देशात राहायच असेल तर जय श्रीराम म्हणावेच लागेल. रामाचा आदर करावाचा लागेल" असे नवनीत राणा म्हणाल्या होत्या. त्यांच्या टीकेला जलील यांनी अकोला येथील जाहीर सभेतून प्रत्युत्तर दिले होते. 'तुझ्या बापाच्या लग्नात आहेर म्हणून हे देश आला आहे का?,' असे वक्तव्य खासदार इम्तियाज जलील यांनी केले होते. त्यांच्या याच टीकेला नवनीत राणा यांनी प्रत्युत्तर दिले होते. 'इम्तियाज जलील हा ओवेसीचा चमचा असून, तुझ्या सारखे किती आले अन् किती गेले आहेत. या देशात रहायचं असेल जय श्रीराम बोलावेच लागेल. इम्तियाज जलील यांच्यात हिंमत असल्यास त्यांनी अमरावतीमधून निवडणूक लढवावी,' असे राणा म्हणाल्या होत्या. आता यावर जलील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :
'जलील ओविसींचा चमचा, तुझ्यासारखे किती आले किती गेले'; नवनीत राणांची जहरी टीका