एक्स्प्लोर

Raj Thackeray & Uddhav Thackeray: तुमचा बेपारी ब्रँड संपेल, पण आमचा मराठी ठाकरे विचार कायम राहील; मनसेच्या संदीप देशपांडेंचं भाजपला सणसणीत प्रत्युत्तर

MNS leader Sandeep Deshpande: मनसेच्या संदीप देशपांडे यांनी भाजपवर आक्रमक भाषेत टीका केली आहे. ब्रँड ठाकरे संपला असे म्हणणाऱ्या भाजप नेत्यांना सणसणीत प्रत्युत्तर

Raj Thackeray & Uddhav Thackeray: आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र येणार हे जवळपास स्पष्ट झाल्यावर भाजप आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत (MNS) शा‍ब्दिक द्वंद्व रंगताना दिसत आहे. बेस्ट निवडणुकीत ठाकरे ब्रँड फेल गेला. बाळासाहेब ठाकरे हा एकच ब्रँड होता. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे ब्रँड नाहीत, अशी बोचरी टीका भाजपच्या नेत्यांकडून अलीकडच्या काळात सातत्याने केली जात आहे. या पार्श्वभूमीवर मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी एक ट्विट करुन भाजपला सणसणीत प्रत्युत्तर दिले आहे. ठाकरे हा ब्रँड (Thakeray Brand) नाही विचार आहे. ब्रँड हा बेपारी लोक उभा करतात तर विचार हा संघर्षातून उभ्या झालेल्या चळवळीतून निर्माण होतो. पैसे ओतून ब्रँड तयार करता येतो पण चळवळ नाही.पैसे संपले की ब्रँड संपतो पण विचार नाही.तुमचा बेपारी  ब्रँड संपणार पण आमचा मराठी ठाकरे विचार नाही, जय महाराष्ट्र, असे संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे. यावर आता भाजपच्या गोटातून काय प्रतिक्रिया येणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 

काही दिवसांपूर्वी भाजपने संदीप देशपांडे यांच्या दादरमधील 'इंदुरी चाट' या हॉटेलवरुन टीकेची झोड उठवली होती. या हॉटेलमध्ये मराठी आचारी नाही, परप्रांतीय आचारी आहे, असा मुद्दा उपस्थित करत भाजपने संदीप देशपांडे यांना मराठीच्या मुद्दयावरुन घेरले होते. या हॉटेलमधील पदार्थ परप्रांतीय, प्रमोशन करत आहेत ते पण परप्रांतीय. नाव देवनागरीत लिहिलं म्हणून मराठीपण? यांना स्वतःच्या हॉटेलमध्ये मराठी आचारी ठेवता येत नाही, आणि हे मराठी महापौराच्या गप्पा मारत आहेत. महापौर मराठीच होणार, पण महायुतीचा आणि हिंदुत्ववादी विचारांचा, असे भाजपने म्हटले होते. संदीप देशपांडे यांनी या टीकेला प्रत्युत्तर देताना म्हटले होते की, "इंदुरी चाट"वरून मला ट्रोल करणाऱ्यांना इतिहास माहीत नाही. मराठे इंदूर भागात गेले, तिथे त्यांनी स्थानिक पदार्थांवर आपला प्रभाव टाकला. तेच पदार्थ पुढे 'इंदुरी फूड' या नावाने ओळखले जाऊ लागले. त्यांना इतिहास माहीत नाही. त्यामुळे त्यांच्या बुद्धीची ही दिवाळखोरी आहे", असे प्रत्युत्तर संदीप देशपांडे यांनी दिले होते.

आणखी वाचा

मुंबईत शिवाजी पार्कमध्ये पण मराठी माणूस उरला नाही; पुरस्कार सोहळ्यातून महेश मांजरेकरांची खंत

'राज ठाकरेंनी भेटायला बोलावलं, म्हणाले, इथे हिंदीत बोला...'; संजय मिश्रा यांनी सांगितला 'तो' किस्सा

About the author अजय माने

अजय माने
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल

व्हिडीओ

KDMC Shiv Sena VS BJP : फोडाफोडीला उधाण, कुणाचं कल्याण? सेना-भाजपत रस्सीखेच? Special Report
Mumbai Mayor : मुंबईचा महापौर कुणाच्या जीवाला घोर? पडद्यामागे कोणाची कुणाशी चर्चा Special Report
Silver Rate Hike : चांदीचे दर वाढण्याची नेमकी कारणं काय? चांदी दर तीन लाख पार.. Special Report
Thane Mahapalika Mayor : बहुमत जोरदार पण कोण 'ठाणे'दार? भाजप-सेनेत वाद पेटणार? Special Report
Snehal Shivkar :'पतीच्या समाजसेवेच्या कामामुळे यश', रिक्षाचालकाची पत्नी ठाकरेंच्या सेनेची नगरसेविका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
पवारांनी ते सत्तेत की विरोधात एकदा सांगावं, पुणे पिंपरीच्या निवडणुकीत त्यांना कात्रजचा घाट दाखवला गेला, लक्ष्मण हाकेंची टीका
बारामतीच्या लोकांनी आग्रह केल्यास इथून विधानसभा लढणार, लक्ष्मण हाकेंची घोषणा, पवारांविरोधात बारामती विकास आघाडी स्थापन
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
मुंबईसह राज्यातील 29 महापालिकेत महापौर, कशी असेल आरक्षण सोडत; चक्राकार पद्धत नेमकं काय?
मुंबईसह राज्यातील 29 महापालिकेत महापौर, कशी असेल आरक्षण सोडत; चक्राकार पद्धत नेमकं काय?
Supreme Court on Liquor Shops: राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटर अंतरातील दारूची दुकाने हटवण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटर अंतरातील दारूची दुकाने हटवण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
Embed widget