Raj Thackeray MNS मुंबई: दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाकरे आणि शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार आहे. ठाकरे गटाचा दसरा मेळावा छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानात, तर शिंदे गटाचा दसरा मेळावा आझाद मैदानावर होणार आहे. दोन्ही गटाकडून मेळाव्याची जोरदार तयारी देखील सुरु झाली आहे. मात्र याचदरम्यान राजकारणातील एक मोठी बातमी समोर आली आहे. 


मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) दसऱ्याच्या दिवशी म्हणजेच उद्या जनतेशी संवाद साधणार आहे. राज ठाकरे पॉडकास्टच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेशी साधणार संवाद आहे. निवडणुकीच्या तोंडावर पॉडकास्टच्या माध्यमातून राज ठाकरे जनतेसमोर आपलं मत मांडणार आहे. त्यामुळे ठाकरे, शिंदे यांच्यासोबत 'राज'वाणीचा आवाजही घुमणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. 


आज वृत्तपत्रांच्या फ्रंट पेजला जाहिराती-


आजच्या अनेक वृत्तपत्रात पहिल्याच पानावर राज ठाकरेंच्या जाहीरात आहेत. यामध्ये माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो...चला पूर्वीसारखा राजकीय सुसंस्कृत आणि सर्व राज्यांपेक्षा प्रगत महाराष्ट्र उभारुया...मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा...असं राज ठाकरेंच्या जाहीरातीमध्ये म्हटलं आहे. 


राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकांचं रणशिंग फुंकलं असून मनसेचे 7 उमेदवार जाहीर केले आहे. यामध्ये शिवडी मतदारसंघातून बाळा नांदगावकर, पंढपूरमधून दिलीप धोत्रे, लातूर ग्रामीणमधून संतोष नागरगोजे, हिंगोलीतून बंडू कुटे, चंद्रपूरमधून मनदीप रोडे, राजुता येथून सचिन भोयर आमि वणी मतदारसंघातून राजू उंबरकर यांना मनसेकडून आगामी विधानसभेसाठी तिकीट देण्यात आले आहे. त्यामुळे उद्याच्या या पॉडकास्टमध्ये राज ठाकरे नेमकं काय बोलणार?, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.


राज ठाकरेंनी घोषित केलेले मनसेचे 7 उमेदवार


1. बाळा नांदगावकर - शिवडी, मुंबई
2. दिलीप धोत्रे - पंढरपूर  
3. लातूर ग्रामीण - संतोष नागरगोजे
4. हिंगोली विधानसभा - बंडू कुटे
5. चंद्रपूर - मनदीप रोडे
6. राजुरा - सचिन भोयर
7. वणी - राजू उंबरकर


रतन टाटांना भारतरत्न द्याच; राज ठाकरेंचं मोदींना पत्र-


ज्येष्ठ उद्योगपती आणि गेल्या ३ दशकांत भारतीय उद्योगजगताला आकार देणारे रतन टाटा यांचं निधन झालं. रतन टाटांना तुम्ही पण जवळून ओळखायचात, आणि त्यातून तुमच्याही लक्षात आलं असेल की, कुठल्याही मानसन्मानाची अपेक्षा न ठेवणारी व्यक्ती होती. पण भारतीय उद्योगजगाला, भारतीय अर्थव्यवस्थेला त्यांनी दिलेलं योगदान आणि त्याहून महत्वाचं माणूस म्हणून जे त्यांचं मोठेपण आहे, ते अफाट होतं. अशा व्यक्तीला खरंतर ते हयात असतानाच 'भारतरत्न'सारख्या सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित करायला हवं होतं. पण आता किमान त्यांना मरणोत्तर भारतरत्न घोषित व्हायला हवी अशी माझी आणि माझ्या पक्षाची इच्छा आणि अपेक्षा आहे. तसेच तमाम भारतीयांची देखील याहून काही वेगळी अपेक्षा असेल असं मला वाटत नाही, असे म्हणत राज ठाकरेंनी नरेद्र मोदींकडे मागणी केली आहे. 


संबंधित बातमी:


Ajit Pawar left Cabinet Meeting: मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयांबाबत अजितदादा नाराज, 10 मिनिटांत बैठक सोडली? अजित पवार म्हणाले....