मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अर्थमंत्री अजित पवार हे नाराज असल्याची माहिती समोर आले आहे. सरकारमधील अनेक मंत्री अर्थखात्याच्या विरोधानंतरही कॅबिनेट बैठकीच्यापूर्वी शेवटच्या क्षणाला महत्त्वाच्या योजनांचे प्रस्ताव मांडत असल्यामुळे अजित पवार नाखूश आहेत. त्यामुळेच अजित पवार हे गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतून अवघ्या 10 मिनिटांत निघून गेल्याचे सांगितले जाते. पुढे ही बैठक तब्बल दोन ते अडीच तास चालली. मंत्रिमंडळाच्या या बैठकीत अनेक महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेण्यात आले.
अजित पवारांचं स्पष्टीकरण
या सगळ्या उलटसुलट चर्चांनंतर अजित पवार यांच्याकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. मी काल कॅबिनेट लवकर सोडून गेलो नाही. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर नियोजित कार्यक्रम लातूर येथे होता. त्यासाठी नांदेड विमानतळ येथे जायचे होते, कॅबिनेट 11 वाजता होती. ही बैठक नियोजित वेळेपेक्षा उशीरा सुरु झाली. महत्वाच्या विषयांची चर्चा कॅबिनेटमध्ये झाल्यानंरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगून मी नियोजित लातूर उदगीर येथे कार्यक्रम यासाठी निघालो. त्यामुळे मी कॅबिनेटची बैठक 10 मिनिटात सोडली ही संपूर्ण खोटी माहिती आहे, असा दावा अजित पवार यांनी केला.
अर्थ विभागाच्या विरोधानंतरही काही संस्थांना जमीन?
अर्थ विभागाने ताशेरे ओढल्यानंतरही विविध संस्थांना जमिनी देण्याचे ऐनवेळी निर्णय, त्यामुळे अजित पवार नाराज असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा, तर रतन टाटांना अभिवादन करण्यासाठी अजितदादा लवकर गेले, अशी माहिती त्यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली. मागील काही कॅबिनेट बैठकात अर्थ विभागाने ताशेरे ओढल्यानंतर देखील विविध संस्थांना जमिनी देणे असे ऐनवेळी निर्णय घेतले जात असल्याने अजित पवारांची नाराजी असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
काल पार पडलेल्या कॅबिनेट बैठकीतून अजित पवार पहिल्या 10 मिनिटांतच बाहेर पडले, एकीकडे 38 महत्त्वाचे निर्णय होत असताना अजित पवार अनुपस्थित असल्याने अजितदादा नाराज असल्याच्या चर्चा आता रंगू लागल्या आहेत. एकीकडे ३८ महत्त्वाचे निर्णय होत असताना अजित पवार अनुपस्थित असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मात्र पूर्णवेळ कॅबीनेट बैठकीत उपस्थित होते.
कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अर्थ विभागाशी संबंधित मौलाना आझाद महामंडळाच्या भागभांडवलात वाढ, मदरशामधील शिक्षकांच्या भाग भांडवलात वाढ, वाणी, लोहार, नाथपंथीय समाजासाठी महामंडळे करण्याचा अर्थ विभागाशी संबंधित महत्वाचे निर्णय होत असताना अजित पवारांची अनुपस्थिती सध्या चर्चेचा विषय होत आहे. मागील काही कॅबिनेट बैठकात अर्थ विभागाने ताशेरे ओढल्या नंतर देखील विविध संस्थांना जमिनी देणे असे ऐनवेळी निर्णय घेतले जात असल्याने अजित पवारांची नाराजी असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
आणखी वाचा