एक्स्प्लोर

Raj Thackeray and Devendra Fadnavis meet: लिटमस टेस्टमध्ये फेल होताच राज ठाकरे फडणवीसांच्या बंगल्यावर भेटीला, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया

Raj Thackeray And Devendra Fadnavis: बेस्ट पतपेढी निवडणुकीत दारुण पराभव होताच राज ठाकरे फडणवीसांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. शिवसेना-मनसे युतीला ब्रेक लागणार?

Raj Thackeray and Devendra Fadnavis: बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंचा दारुण पराभव झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मनसेप्रमुख राज ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) भेटीला गेल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) हे गुरुवारी सकाळी अचानक वर्षा बंगल्यावर देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला पोहोचले. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर आता ठाकरे गटातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांच्या भेटीबाबत भाष्य केले आहे. 

राज ठाकरे हे कदाचित गणपतीसाठी घरी येण्याचं आमंत्रण द्यायला देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेले असतील, असे संजय राऊत यांनी म्हटले. राज ठाकरे यांना कदाचित राज्यातील एखाद्या प्रश्नाबाबत देवेंद्र फडणवीसांशी बोलायचे असेल. फडणवीसांच्या काळात मुंबई दोन दिवस बुडाली होती. राज्यातील प्रमुख शहरं पाण्यात बुडाली होती. याबाबत राज ठाकरेंना मुख्यमंत्र्यांशी बोलायचे असेल. महाराष्ट्राच्या राजकारणात विरोधी पक्षाचे नेते मुख्यमंत्र्यांना भेटत असतात. यापूर्वीही राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे भेटले आहेत. आजची भेट कशासाठी आहे, हे राज ठाकरेच सांगू शकतात. राज ठाकरे यांचा स्वभाव पाहता ते या भेटीविषयी स्पष्ट आणि परखडपणे बोलतील, असे मला वाटते. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटणं राजकीय अपराध नाही. उद्धव ठाकरे किंवा माझं मुख्यंत्र्यांकडे काम असले तर आम्हीही त्यांना भेटू. बेस्टची निवडणूक इतकी गांभीर्याने घेण्याची गरज नाही. ती एका पतपेढीची निवडणूक होती. त्याची चर्चा आणि महत्त्व बेस्ट आगारापर्यंतच मर्यादित आहे, असे  संजय राऊत यांनी म्हटले.

Raj Thackeray and Uddhav Thackeray: आलात तर तुमच्यासह नाहीतर तुमच्याशिवाय, हे आमचं ठरलंय, राज-फडणवीस भेटीवर सुषमा अंधारे काय म्हणाल्या?

राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीबाबत चिंता करायचे कोणतेही कारण नाही. राज्याचा मुख्यमंत्री मुख्य प्रवाहातील नेत्याला भेटतो. यावरुन दरवेळी वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही. राज ठाकरे यांच्यावर आमचं बंधन नाही, तु्म्ही अमूकतमुक नेत्याला का भेटलात, हे आम्ही त्यांना विचारत नाही, असे ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी म्हटले. बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत भाजपलाही यश मिळालेले नाही. तिसऱ्याच आघाडीचा विजय झाला आहे. बॅलेट पेपरवर निवडणूक झाली की, भाजप अपयशी ठरतो, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. 

जेव्हा नाती ताणली जातात तेव्हा विश्वास फार मोठी गोष्ट असते. त्यामुळे एवढ्या तेवढ्यावरुन अविश्वास व्यक्त करण्याची गरज नसते. यापूर्वीही राज ठाकरे हे वांद्र्यातील ताज लँडस एन्डस हॉटेलमध्ये फडणवीसांना भेटले होते. आमचं तेव्हाच ठरलं होतं, आलात तर तुमच्यासह नाहीतर तुमच्याशिवाय, पण लढणं अपरिहार्य आहे. राज ठाकरे आणि फडणवीसांच्या आजच्या भेटीनंतर लगेच युती तुटली वगैरे निष्कर्ष काढू नयेत, असेही सुषमा अंधारे यांनी म्हटले.

आणखी वाचा

बेस्ट पतपेढी निवडणुकीत दारुण पराभव होताच राज ठाकरे फडणवीसांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

महत्त्वाच्या बातम्या

Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
Shiv Sena Symbol Case : शिंदेंच्या 31 आमदारांनी स्वेच्छेने शिवसेना सोडली, पाठीशी महाशक्ती असल्याचा दावा म्हणजे पक्षविरोधी कारवाई; शिवसेनेच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे
शिंदेंच्या 31 आमदारांनी स्वेच्छेने शिवसेना सोडली, पाठीशी महाशक्ती असल्याचा दावा म्हणजे पक्षविरोधी कारवाई; शिवसेनेच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे
आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद
आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद
माजलगाव नगरपालिकेच्या नगरसेविका रेखा अंबुरेंचं कुणबी प्रमाणपत्र रद्द, बनावट पुरावे सादर करुन प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोप
माजलगाव नगरपालिकेच्या नगरसेविका रेखा अंबुरेंचं कुणबी प्रमाणपत्र रद्द, बनावट पुरावे सादर करुन प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोप

व्हिडीओ

Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद
आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत
Tukaram Mundhe: ॲनालॉग पनीर काय आहे, 1 वर्षांनंतरही बंदी वाढवणार का? तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, म्हणाले, आरोग्याशी तडजोड नाही
ॲनालॉग पनीर काय आहे, 1 वर्षांनंतरही बंदी वाढवणार का? तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, म्हणाले, आरोग्याशी तडजोड नाही
Mumbai Mayor Bunglow : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग; टीकेची झोड उठताच महापौर रितू तावडेंचं स्पष्टीकरण, म्हणाल्या महापौर बंगल्याचा चुकून उल्लेख
मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग; टीकेची झोड उठताच महापौर रितू तावडेंचं स्पष्टीकरण, म्हणाल्या महापौर बंगल्याचा चुकून उल्लेख
FDA Raid Analog Paneer: संभाजीनगरमधील डेअरीवर एफडीएची धाड, ड्रममध्ये भरलेलं पनीर अन् तूप सापडलं, किळस आणणारे फोटो
संभाजीनगरमधील डेअरीवर एफडीएची धाड, ड्रममध्ये भरलेलं पनीर अन् तूप सापडलं, किळस आणणारे फोटो
वाल्मिक कराडला नागपूर कारागृहात पाठवा, पोलिसांवरही गुन्हे दाखल करा; सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
वाल्मिक कराडला नागपूर कारागृहात पाठवा, पोलिसांवरही गुन्हे दाखल करा; सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
Rahul Gandhi on Amit Shah: विद्यार्थ्यांचे गुन्हेगार असल्यानेच अमित शाह तोंड लपवत आहेत; गृहमंत्री संसदेत येत नसल्याने राहुल गांधींचा हल्लाबोल
विद्यार्थ्यांचे गुन्हेगार असल्यानेच अमित शाह तोंड लपवत आहेत; गृहमंत्री संसदेत येत नसल्याने राहुल गांधींचा हल्लाबोल
Embed widget