Parbhani News : शासकीय कामासाठी अधिकाऱ्यांनी पैसे मागितल्यास त्याला मारहाण करा, तसेच त्याने शासकीय कामात आणल्याचा गुन्हा दाखल केल्यास त्याच्यावर ॲट्रॉसिटीचा (Atrocity) गुन्हा दाखल करा असे वक्तव्य रासप आमदार रत्नाकर गुट्टे (MLA Ratnakar Gutte) यांनी केले आहेत. त्यांच्या या वक्तव्यावरून आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. परभणी (Parbhani)जिल्ह्यात एका विकास कामाच्या उद्घाटनासाठी आलेल्या आमदार गुट्टे यांनी हे वक्तव्य केले आहेत. 


परभणीच्या गंगाखेडमध्ये आयोजित भूमिपूजन सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी रासप आमदार रत्नाकर गुट्टे उपस्थित होते. दरम्यान याच कार्यक्रमात बोलतांना ते म्हणाले की, "पाणी पुरवठ्याच्या कामामध्ये अनेक तक्रारी येतात. काम पूर्ण करण्यासाठी पैशांची मागणी केली जाते. मात्र, मी माझ्याकडे आलेल्या लोकांना एक फॉर्म्युला सांगितलाय. जर, कोणी काम अडवून पैशाची मागणी केली, तर त्याला मारा आणि नुसतं मारायचं नाही. तर, सोबत एक मागासवर्गीय घेऊन जायचे, म्हणजे त्यांनी 353 केल,  तर आपण ॲट्रॉसिटी करायची म्हणजे तो नीट होतो, असा वादग्रस्त सल्ला रासप आमदार रत्नाकर गुट्टे यांनी दिला आहे. 


गुट्टे म्हणतात मी खूप हुशार...


परभणीच्या गंगाखेडमध्ये आज पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारत व अधिकारी, कर्मचारी निवासस्थानाच्या बांधकाम भूमिपूजन सोहळ्याचं आयोजन रासपा आमदार रत्नाकर गुट्टे यांचे हस्ते करण्यात आलं. यावेळी बोलताना गुट्टेंनी आपण मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या जवळचे असून, या तिघांनाही असं वाटते की मी त्यांच्याकडे येणार आहे. त्यांच्या पक्षात येणार आहे. मात्र, मी लय हुशार आहे.  मी सर्व काम करून घेतो असे गुट्टे म्हणाले. 


नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता...


शासकीय कामासाठी पैसे मागणाऱ्या अधिकाऱ्यांना मारण्याचा सल्ला देत त्यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा असे वक्तव्य करणाऱ्या गुट्टे यांच्या विधानाने नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. त्यांच्या याच वक्तव्याचे राजकीय पडसाद देखील उमटण्याची शक्यता आहे. 


कोण आहेत रत्नाकर गुट्टे? 


आमदार रत्नाकर गुट्टे गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करतात. भारतीय राष्ट्रीय समाज पक्षाकडून त्यांनी विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला होता. विशेष म्हणजे तुरुंगात राहून त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती आणि जिंकून देखील आले होते. 2020 मध्ये त्यांच्यावर ईडीने कारवाई करत गुट्टेंच्या गंगाखेड शुगर्सची तब्बल 225 कोटींची मालमत्ता जप्त केली होती. त्यामुळे गुट्टे चर्चेत आले होते. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Narendra Patil : मराठ्यांना उचकवू नका, अन्यथा घरात घुसून...; ओबीसी नेत्यांना नरेंद्र पाटलांचा थेट इशारा