मुंबई : राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आज होत असून तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) अजित पवार गटाचा मुंबईत मेळाव संपन्न होत आहे. या मेळाव्यातील भाषणात अजित पवारांनी तुफान फटकेबाजी केली. त्यामध्ये, निवडणुकांमधील विजय, सध्या आमदारांना दिलेल्या मंत्रिपदाचा कालावधी आणि इतरही बाबींवर भाष्य केलं. राज्य सरकारमधील नवीन मंत्र्यांचा शपथविधी काल मुंबईला होणार होता, म्हणून आज मेळावा घेतला. मात्र, आज नागपुरला शपथविधी होत आहे. तरी देखील आपला मेळावा इथं होत आहे, असे म्हणत अजित पवारांनी (Ajit pawar) मंत्रिमंडळ विस्तारावर भाष्य केलं. तसेच, पुढील काही महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
राज्यात फेब्रुवारी 2022 मधे जिल्हा परिषद निवडणुका होण गरजेचं होतं. मात्र, 3 वर्षे निवडणुका झाल्या नाहीत, आता अनेक निवडणुका होणार आहेत, असे म्हणत अजित पवारांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर भाष्य केलं. तसेच, मंत्रिमंडळ विस्तारातील मंत्र्यांचा कालावधी देखील त्यांनी सांगितला.
2 महिन्यातच महामंडळांचेही वाटप
मंत्रिमंडळ विस्तार पार पडल्यानंतर सुनील तटकरे, चंद्रशेखर बावनकुळे आणि एकनाथ शिंदे यांचा एक व्यक्ती एकत्र बसणार आहे. त्यानंतर, 2 महिन्यातच महामंडळ निवडी पार पडणार आहेत. मंत्रिमंडळात सगळ्यांना संधी देता येत नाही. कहीजणांना मागच्या वेळी दीड वर्षांची टर्म मिळाली. आम्ही आता ठरवलं आहे, आता 5 वर्षात मंत्र्यांना अडीच-अडीच वर्षे टर्म देण्यात येणार आहे. आमचं देखील त्यावर एकमत झालं आहे. सध्या शपथ घेणाऱ्या मंत्र्यांना अडीच वर्षाचा काळ मिळणार आहे, अशी घोषणाच अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या मेळाव्यातून केली.
मी स्वभाव बदलला, परिणाम दिसला
लोकसभेला मी तटकरे साहेबांना म्हणायचो तटकरे साहेब तुम्ही तरी तुमची लोकसभेची जागा काढा. जर अली नसती तर भोपळा मिळाला असता. तटकरे साहेब मला म्हणून शकत नव्हते तुमची जागा काढा म्हणून. मात्र, त्यांनी जागा काढली, आम्ही मात्र त्यानंतर खूप बदल केले. मी माझा स्वभाव बदलला. जबाबदारी आली की माणूस बदलतो. मी ठरवला आता कुणावर चिडायचं नाही. मी स्वभाव बदलला त्याचा परिणाम दिसला, अशी मिश्कील टीपण्णी देखील अजित पवारांनी मेळाव्यातून केली. दरम्यान, लवकरच पक्षाचे शिबिर होणार आहे. आपल्याकडून गैरसमज होतील अशी वक्तव्ये करू नये. जानेवारी महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं शिबिर होईल, अशी माहितीही त्यांनी दिली.
विजयावर मिश्कील टिपण्णी
सत्कार सोहळ्यात गेल की मोठा हार किंवा ट्रॉफी दिली की समजायच यान काहीतरी वंगाळ काम केलेलं आहे. त्यावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न केला आहे. सुनिल शेळके सांगत होते माझं काही खरं नाही. सुनील तटकरे, प्रफुल पटेल यांना त्याने झोपू दिलं नाही. त्यांच्या ठिकाणचा प्रकार आणि त्याची तक्रार केंद्रात गेली होती. इंद्रनील नाईकच्या विरोधात ययाती नाईक त्याचा भाऊ उभा होता. मात्र, तो देखील निवडून आला. राजू कारेमोरे 65 हजार मतांनी निवडून आले. काय कळायला नाही काय झालं ते, अशी फटकेबाजी अजित पवार यांनी मेळाव्यातून केली.
विदर्भातील राजकीय परिस्थितीवर भाष्य
आपण विदर्भात 7 जागा लढलो. मोर्शीतील जागेवर मैत्रीपूर्ण लढत झाली. जर तसं झालं नसतं तर देवेंद्र भुयार निवडून आले असते. बुलढाणा जिल्हाध्यक्ष काजी यांचं अभिनंदन करतो. बुलढाणा बँक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी 300 कोटी रुपये देण्याची व्यवस्था त्यांनी केली. शेतकऱ्यांसाठी केल, मात्र त्या ठिकाणी असलेली व्यक्ती आपलाल्या सोडून गेले. आम्ही काजी यांना विचारलं त्यांनी मनोज कायंदे यांचं नाव सांगितल. त्यांनी सांगितल होतं जर तो निवडून आला नाही तर आम्ही तोंड दाखवणार नाही. आम्ही काजी साहेब यांच्या पाठीशी उभ राहिलो आणि कायंदे यांना संधी दिली आणि तो निवडून आला, असे म्हणत अजित पवारांनी बुलढाण्यातील राजकीय घटनेवर भाष्य केलं.