CM Devenra Fadnavis In Nagpur : मुखमंत्री झाल्यानंतर प्रथमच मी माझ्या कर्मभूमी आणि पुण्यभूमीत येतोय. त्याचा अतिशय आनंद असून साहजिकच नागपूर माझा परिवार आहे. त्यामुळे माझ्या परिवाराकडून होणारे हे स्वागत आहे. मंत्रीमंडळाच्या विस्तार संदर्भातील सगळी नावं समोर आली आहेत. त्याअनुषंगाने आज 4 वाजता शपथविधी होणार असल्याची पहिली प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आज (15 डिसेंबरला) प्रथमच नागपुरात दाखल झाले आहेत. त्यांनंतर त्यांचे नागपूर विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आले. त्यावेळी बोलताना त्यांनी ही पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
नागपूर माझा परिवार. त्यामुळे माझ्या परिवाराकडून होणारे हे स्वागत-देवेंद्र फडणवीस
यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवरही तोफ डागली आहे. विरोधक निराश झालेले लोक आहेत. पडलो तरी पाय वर अशी त्यांची मानसिकता आहे. लोकशाहीवर त्यांच्या विश्वास नाही, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने तयार केलेल्या निवडणुक आयोगावर त्यांच्या विश्वास नाही. सुप्रीम कोर्टावर यांचा विश्वास नाही. त्यामुळे देशाची राज्यघटना नाकारणारे हे लोक असल्याची टीका ही देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. नागपूर विमानतळावर दाखल झाल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
नितीन गडकरी स्वतः विमानतळावर उपस्थित
मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचे आज पहिलं नागपूर आगमन होत आहे. यावेळी भाजपच्या वतीने त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. यात प्रामुख्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ही विमानतळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागता वेळी उपस्थित राहणार आहे. दरम्यान गडकरी रॅलीमध्ये सहभागी होतील की नाही हे अजून स्पष्ट नाही. मात्र यावेळी रॅलीमध्ये भाजपचे चंद्रशेखर बावणकुळे, पत्नी अमृता फडणवीस, आमदार कृष्णा खोपडे, आमदार आशीष जयस्वाल इत्यादिसह अनेक मोठे नेते या रॅलीमध्ये उपस्थित झाले आहे.
विशेष म्हणजे राजकारणात देवेंद्र फडणवीस हे गडकरी यांचे जूनियर आहे. फडणवीस ही नेहमीच गडकरींना माझे मार्गदर्शक आणि नेते असल्याचे संबोधतात. राजकीय दृष्टिकोनातून महत्त्वाच्या प्रसंगी सल्ला घेण्यासाठी, चर्चा करण्यासाठी देवेंद्र फडणवीस नितीन गडकरी यांच्या घरी जात असतात. निवडणुकीच्या वेळेलाही दोन वेळेला फडणवीस गडकरींच्या घरी गेले होते. उमेदवारी अर्ज दाखल करतानाही देवेंद्र फडणवीस यांचा औक्षण गडकरींच्या घरी झालं होतं. मात्र आज तेच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून नागपुरात येत असताना गडकरी मोठेपणा दाखवत त्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर जात आहे.
मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी विशेष रथ
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नागपुरात आगमन झाल्यानंतर ते रॅलीचे स्वरूपात विमानतळ ते लक्ष्मी भुवन चौकापर्यंत जाणार आहे. रॅलीमध्ये देवेंद्र फडणवीस एका खुल्या रथावर स्वार होऊन लोकांचे अभिवादन स्वीकार करत आहेत. यासाठी भाजपच्या वतीने एक विशेष रथ तयार करण्यात आला आहे. खुल्या ट्रकवर विशेष शिडी लावून एक विशेष मंच ही तयार करण्यात आला आहे. त्यावर मुख्यमंत्री उभे राहून वेगवेगळ्या मार्गाने मार्गक्रमण करत लोकांचा अभिवादन स्वीकारत आहेत.
हे ही वाचा