Jyoti Waghmare : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते अक्षरश वेटिंग लिस्टमध्ये आहेत. अनेक मोठे चेहरे हे महापालिका निवडणुकांच्या आधी आमच्याकडे येतील आणि एक प्रचंड मोठ भूकंप होईल असं वक्तव्य शिवसेना प्रदेश प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी केलं. उबाठा ही खऱ्या अर्थाने शिल्लक सेना बनेल अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली असल्याचे वाघमारे म्हणाल्या.


उबाटाच्या बैठकीमध्ये भास्कर जाधव सांगताहेत की आता उबाटाची काँग्रेस झाली आहे असंही वाघमारे म्हणाल्या. एकीकडे उद्धव ठाकरे म्हणतात की आम्ही स्वतंत्र लढणार तिसरीकडे पवार साहेबांचं काय चाललेल आहे, त्यांचे नेते पुन्हा परत अजित दादांच्याकडे येत असल्याचे वाघमारे म्हणाल्या. विरोधकांनी आधी आपल्या घराकडं पाहावं. त्यांची अवस्था सध्या अशी झाली आहे की, आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून असे म्हणत वाघमारे यांनी विरोधकांवर टीका केली.


एकनाथ शिंदे हे आपल्या माणसांमध्ये आणि आपल्या शेतीच्या मातीमध्ये रमायला तिथे जातात


एकनाथ शिंदे साहेब हे त्यांचे मूळ गावी गेले की लोकांना उगीचच असं वाटतं की ते नाराज आहेत. अशा बारीक सारीक कारणांवरून नाराज होऊन कुठेतरी असं निघून एकांतात जावं अशा पद्धतीच व्यक्तिमत्व हे एकनाथ शिंदे साहेबांचं अजिबात नसल्याचे वाघमारे म्हणाल्या. एकनाथ शिंदे यांना आपल्या मातीची ओढ आहे, आपल्या गावाची, शेतीची ओढ आहे. त्यामुळं ते आपल्या माणसांमध्ये आणि आपल्या शेतीच्या मातीमध्ये रमायला तिथे जातात. त्यामुळं अशा पद्धतीच्या नाराजीच्या अफवा जर कोणी पसरवत असतील तर त्या चुकीच्या असल्याचे वाघमारे म्हणाले. 


एकनाथ शिंदे हे जनतेतून आलेलं नेतृत्व 


एकनाथ शिंदे हे मातीतून उगवलेलं नेतृत्व आहे. जनतेतून आलेलं नेतृत्व आहे, त्यांना संपवण्याचा दम कोणामध्येच नाही असेही वाघमारे म्हणाल्या. एकनाथजी शिंदे साहेब को मिटा सके ये किसी मे दम नही. लाडका भाऊ म्हणून ज्या पद्धतीने त्यांनी लाडकी बहीण योजना आणली किंवा मुलींचे शिक्षण मोफत केलं अनेक धाडसी निर्णय घेतल्याचे ज्योती वाघमारे म्हणाल्या. जली को आग केहते है बूजीको राख कहते है,उस राख से भी जो बारुद बना सके उन्हे एकनाथ शिंदे कहते है आणि त्यामुळे दिवसेंदिवस बहरत जाईल असे वाघमारे म्हणाल्या. 


रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाबाबत आमचे तिनही नेते समतोल साधण्यास सक्षम


रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाबाबत देखील ज्योती वाघमारे यांनी वक्तव्य केल. तीन पक्ष जेव्हा एकत्र येतात, त्यावेळेला त्यांच्यामध्ये समन्वय साधत असताना काही गोष्टी होत असतात असे वाघमारे म्हणाल्या. आपण जेव्हा बघतो की एका कुटुंबामध्ये जर तीन भाऊ असतील  तर त्यांच्यामध्ये सुद्धा कधी थोडासा इकडच तिकडचं होतं. आमच्या तीनही पक्षांमध्ये जे नेते आहेत ते समन्वय साधून रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाबाबत मार्ग काढतील असे वाघमारे म्हणाल्या. दादाजी भुसे हे शिवसेनेचं एक मोठं व्यक्तिमत्व आहे. त्यांनी ज्या पद्धतीने राज्याची जबाबदारी पार पाडली त्यामुळे नक्कीच त्यांच्याही नेतृत्वाला न्याय मिळेल असे वाघमारे म्हणाल्या. अंतर्गत नाराजी वगैरे अशा गोष्टी ह्या अगदी बाहेरच्या लोकांनी चालवलेल्या आहेत. पालकमंत्रीपद किंवा इतर गोष्टी याच्यामध्ये समन्वय साधण्यासाठी आमचे तीनही नेते हे अतिशय सक्षम असल्याचे वाघमारे म्हणाल्या. 


लाडक्या बहिणीला दिलेली ओवाळणी परत घ्यायची नसते


लाडक्या बहिणीला दिलेली ओवाळणी परत घ्यायची नसते. हे आमच्या लाडक्या बहिणींना माहिती असल्याचे वाघमारे म्हणाल्या. अदिती तटकरे यांनी सांगितलं आहे की, महाराष्ट्र शासन हे सक्तीने पैसे अजिबात परत येणार नाही. ज्या महिला निकषात बसत नसतील तर त्यांनी जर स्वतःहून पैसे परत केले तर ठीक आहे. पण भगिनींना दिलेली ओवाळणी पुन्हा परत घ्यावी असं आमचं महायुती शासन नसल्याचे वाघमारे म्हणाल्या. 


आपल्या पक्षाचा किती अस्तित्व शिल्लक आहे ते बघावं, वडेट्टीवारांना वाघमारेंचा टोला


आधी आपल्या पक्ष कसा संपला आहे, आपल्या पक्षाचा किती अस्तित्व शिल्लक आहे ते बघावं असे म्हणत ज्योती वाघमारे यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर टीका केली. आपलं नेतृत्व जर एवढं सक्षम होतं तर निवडणुकीमध्ये एवढा मोठा फटका का बसला? त्याचं थोडं आत्मपरीक्षण वडेट्टीवार यांनी करावं असेही वाघमारे म्हणाल्या.