छत्रपती संभाजीनगर : मराठ्यांच्या (Maratha Reservation) लोकांनी मराठ्यांवर आरोप करणे बंद करा.. तुमच्यामुळे एक दिवशी जात मरेल.. लवकर शहाणे व्हा.. असा सल्ला मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) पाटलांनी राधाकृष्ण विखे पाटील (RadhaKrishna Vikhe Patil) यांना दिला आहे. जातीवाद भुजबळ करत आहे. राज्यात जे काही होतोय ते भुजबळ घडून आणत आहे, अशी टीका देखील मनोज जरांगेंनी यावेळी केली. ते माध्यामांशी बोलत होते.
मराठा समाजाचे आंदोलन भरकटत चालले आहे. मनोज जरांगे म्हणजे मराठा समाज नव्हे, अशी टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोज जरांगेंवर केली.त्यावर आज मनोज जरांगेंनी आज प्रत्युत्तर दिले आहे. मनोज जरांगे म्हणाले, आंदोलन भरकटले नाही. मराठा समाज हा 1984 पासून कुणबीत आहे. महाराष्ट्रातला सर्व मराठा हा कुणबी आहे हेच गेल्या 10 वर्षापासून मी सांगत आहे. कधीतरी जातीकडून बोलायला शिका... तुमच्या वडिलांचे मोठे योगदान आहे. कधीतरी मराठ्यांच्या लेकरांसाठी बोलायला शिका.. खरे बोलायला शिका...मराठ्यांवर काय वेळ आली आहे. तुमच्या आसपासचे ओबीसींचे नेते मराठ्यांच्या विरोधात यायला लागले. तुमच्या नगर जिल्ह्यातले ओबीसीचे आमदार इकडे येऊन ओरडत आहे ते नाही भरकटलेले दिसत नाहीय मी कायद्याला धरून बोलतो मात्र हे आंदोलन भरकटले म्हणतात.मराठ्यांच्या लोकांनी मराठ्यांवर आरोप करणे बंद करा.. तुमच्यामुळे एक दिवशी जात मरेल.. लवकर शहाणे व्हा.. .
तुम्ही डोळे उघडा तुम्हाला मराठे उघडे पडू देणार नाही, जरांगेंचे मराठा नेत्यांना आवाहन
मराठ्याच्या नेत्यांना प्रवेश नाही, या पोस्टरबाजीवर मनोज जरांगे म्हणाले, विखे पाटलांनी त्या गावात जाऊन यावे, आंदोलन भरकटलय... मी जातीवाद करतो असे म्हणतात आता हे दिसत नाही.आमच्या लोकांना सर्व पुढाऱ्यांना गावबंदी केली होती. सगळ्या नेत्यांसाठी लावले होते. परंतु यांचा राग मराठा समाजाच्या नेत्यावर आहे. मराठा समाजाला देखील आवाहन करतो की, मराठा नेत्यांवर राग व्यक्त करायचा नाही. आम्ही म्हणत होतो की आमच्या नेत्यांनी वाटोळे केले. मराठ्याच्या नेत्यांनी पण शहाणे व्हा...डबडेडुबडे उगाच.. यासाठी आम्ही तुम्हाला मोठे केले . आता हा जातीवाद नाही का? मराठा नेत्यांना गावबंदी हा जातीवाद नाही का? पुढारी हा पुढारी असतो. जातीवाद तुम्ही करायला लागले... आता शहाणे व्हा..मनोज जरांगेंना का दोष देता... गोरगरीबांच्या मराठ्यांची लेकर मोठी व्हावी म्हणून जीवाची बाजी लावली. आता मी एकटा पडलोय... माझी जात संकटात आली.... डोळे उघडे ठेवा.. तुम्ही डोळे उघडा तुम्हाला मराठे उघडे पडू देणार नाही.
भुजबळ राज्यात जातीवाद करत आहे : मनोज जरांगे
जरांगे म्हणाले, बोर्ड हे भुजबळने लावायला लावले आहेत. राज्यात जातीवाद भुजबळ करत आहे. राज्यात जे काही होत आहे ते भुजबळ घडून आणत आहे. दुसरे कोणी नाही.. आम्ही कोणाला दोष देत नाही आणि बोलणार पण नाही. 13 तारखेपर्यंत शांत राहण्याचे शंभुराज देसाईंचे म्हणणे आहे. आम्ही शांत राहू 14 पासून बघून घेऊ काय करायचे... भुजबळ साहेब मी काय आहे हे तुम्हाला कळणार नाही. या वयात हाताने एवढ्या मोठ्या समाजाची नाराजी व्यक्त करून घेऊ नका.
Video :