Manoj Jarange Patil on Chhagan Bhujbal : "आपल्या मराठ्यांत माझ्या सकट 150 उमेदवार आहेत. जर 29 तारखेला उभ करायचं ठरलं तर तुम्हाला जातीसाठी काम करायचं. एक जण उभं करायचं आणि त्याला सगळ्यांनी मिळून निवडून आणायचे. मराठ्यांनी 100 टक्के मतदान करायचं आहे. 3 महिने काम करा, 5 वर्ष मराठ्यांचे कल्याण होईल. मतदान झाल्याशिवाय तीर्थ क्षेत्राला जायचं नाही. बोगस मतदान बाहेर काढायचं, मतदान केल्याशिवाय शेताकडे जायचं नाही. गिरीश महाजन तुमच्या मतदारसंघात 1 लाख 36 हजार मतदार मराठा आहेत, येवल्यामध्ये सुद्धा 1 लाख 16हजार मतदार मराठा आहेत", असं मराठा आंदोलक मनोज जरांगे म्हणाले. ते पुण्यात बोलत होते. 


सगे सोयरे आरक्षणासाठी सरकार पाडायचे


मनोज जरांगे म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी जेवढं रक्त आमच्या आई बहिनेचे सांडायचे तेवढे सांडले. आता फक्त सगे सोयरेचे अंबलजावणी राहिली आहे. सगे सोयरे आरक्षणासाठी सरकार पाडायचे. 75  वर्ष आम्ही तुम्हाला दिले, 5 वर्ष आमच्यासोबत राहा. काहीही करा तुम्ही एकजूट दाखवा. मुंबईला चक्कर हानायची का? काही काही जणांना मस्ती आली आहे. जात हवी तर मराठा सारखी पाहिजे. खानदेश, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा मधले सगळे सीट पडणार आहे. 


मुंबईत निवडून आणणं जरा जड आहे,पण तिथे गेलेले महाराष्ट्रातील मराठा आहेत. पक्षाला आणि नेत्याला बाप मानने बंद करा, मरेपर्यंत तुमच्याशी गद्दरी करणार नाही. मराठा आणि कुणबी एकच आहे, सरकारने हा कायदा पारिद केला आहे. शिंदे आणि फडणवीस यांना सांगतो  आमच्या मागण्या पूर्ण करा, असा इशाराही जरागेंनी दिला. 


फडणवीस, भुजबळ यांना दंगली घडवायची आहेत


मी लढायला तयार आहे. मला चारही बाजूने घेरले आहे,आता फक्त उघडे पडू नका फक्त एकजूट राहा. फडणवीस, भुजबळ यांना दंगली घडवायची आहेत. मराठ्यांनी ओबीसी यांच्यावर अंगावर जाऊ नका आणि त्यांनी पण मराठ्यांच्या अंगावर जाऊ नका राज्य शांत ठेवा. मी जिवंत आहे तोपर्यंत तुमच्या केसाला पण धक्का लागणार नाही, असंही आवाहनही मनोज जरागेंनी केला. 





इतर महत्वाच्या बातम्या


Sharad Pawar on Dilip Sopal : बहुसंख्य आमदारांपैकी दिलीप सोपल जवळचे, विधानसभेत माझ्यासोबत काम केलंय, त्यांनी बार्शी अन् सोलापूरचे नाव केले : शरद पवार