Sharad Pawar on Dilip Sopal, सोलापूर : "जुन्या सहकाऱ्यांना भेटण्यासाठी मी आलोय. विधानसभेत माझ्यासोबत दिलीप सोपल यांनी काम केले. 288 आमदार असतात त्यातील बहुसंख्य आमदारांपैकी दिलीप सोपल (Dilip Sopal)  हे जवळचे आमदार आहेत. बार्शी आणि सोलापूरचे नाव दिलीप सोपल यांनी केले", अशा शब्दात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी माजी मंत्री दिलीप सोपल यांचे कौतुक केले आहे. बार्शीत (Barshi) आज 'शेतकरी शरद मेळावा' पार पडला. यावेळी शरद पवार उपस्थित होते. त्यांनंतर त्यांनी सोपल यांच्या निवासस्थानी भेट दिली. शिवाय अनेक जुन्या सहकाऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या. यावेळी ते बोलत होते. 


शरद पवार म्हणाले, बार्शी तालुका हा ज्वारी, सोयाबीन, त्याचबरोबर टेक्स्टाईल मीलसाठी प्रसिद्ध होता. बार्शीची उणीव दिलीप सोपल यांनी भरून काढली.  मंत्री म्हणून त्यांनी अतिशय चांगले काम सोपल यांनी केले. सरकारने जे काम दिले ते चांगले करण्याचे काम त्यांनी केले. प्रामाणिकपण कामं करणार नेतृत्व म्हणून सोपल माहिती आहेत.


सत्ताधारी जेव्हा निवडणुकीला सामोरे जातील तेव्हा त्यांना या प्रश्नाला समोर जावे लागेल


पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, दोन तीन महिन्यांनी निवडणूक येतील.  सत्ताधारी जेव्हा निवडणुकीला सामोरे जातील तेव्हा त्यांना या प्रश्नाला समोर जावे लागेल. महाविकास आघाडी म्हणून तुम्ही मांडलेल्या मुद्द्याचा विचार करू. तुम्ही लोकांनी प्रणिती शिंदेना, धैर्यशील मोहितेना संसदेत पाठवलं.  या लोकांच्या माध्यमातून देशाच्या संसदेत मांडणं ही आमची नैतिक जबाबदारी आहे. आज अनेक गोष्टीची पूर्तता  भटक्या जमातींसाठी करावी लागणार आहे. या जमातीची जणगना करण्याची मागणी करण्यात आली.  जो पर्यंत लोकसंख्या कळणार नाही, तो पर्यंत सरकार समोर प्रश्न मांडता येणार नाही.  त्यामुळे एकदा ही जणगणना झाली पाहिजे.


आज मुलं शिकतायत, घटनेने शिक्षणाचा मूलभूत अधिकार दिला


दलित वस्ती, रमाई वस्ती, गायरन जमिनीवर भटक्या जमातीमधील लोकांना घरे बांधण्यात यावी, अशी मागणी केली. सरकार म्हणते की आज आम्ही गरीब लोकांना घरे दिली. पण शेवटच्या टोकाला असणाऱ्या या लोकांना किती घरे दिली गेली याचा ही विचार झाला पाहिजे. आज मुलं शिकतायत, घटनेने शिक्षणाचा मूलभूत अधिकार दिला.  ती जरं राबवायची असेल तर आश्रम शाळा झाल्या पाहिजेत.  नियमामुळे आश्रम शाळांची संख्या वाढत नाहीये. 




इतर महत्वाच्या बातम्या


Rajendra Raut : तुमची लायकीचं काय? रोहित पवार माझा नाद करु नका, ज्यांनी नाद केला त्यांना गारेगारचे गाडे लावून दिलेत, राजेंद्र राऊतांचे प्रत्युत्तर