Manoj Jarange: राज्यात एकीकडे विधानसभा निवडणूकांचे सर्व राजकीय पक्षांना वेध लागले आहेत. तर दुसरीकडे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे 288 पाडणार की नाही याबाबत भूमिका नेमकी कधी मांडणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, आज काम सोडून कोणीही येऊ नका असं मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे म्हणालेत. आज छोटी बैठक असून विधानसभा निवडणूकांच्या तारखा जाहीर झाल्यावर भूमिका जाहीर करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. आंतरवली सराटीमधून ते माध्यमांशी बोलत होते.
मराठा समाज २९ ऑगस्ट २०२३ रोजी एकत्र आला होता. आज त्या दिवसाची वर्षपूर्ती असल्याचं सांगत राज्यातील मराठा समाजानं एकत्रित येणं गरजेचं असल्याचं सांगत राज्यातील पावणेदोन कोटी मराठा ओबीसी आरक्षणात गेले असल्याचं जरांगे म्हणाले.
मी जातीयवादी नाही, आरक्षण मागतोय...
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे मागील अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसह विधानसभेत २८८ पाडायचे की नाही यावर बोलताना दिसत आहेत. राज्यात मराठा आरक्षण कार्यकर्ते याबाबत महाविकास आघाडीसह मराठवाड्यात येणाऱ्या नेत्यांना भूमिका मांडत आहेत. दरम्यान आज त्यांनी मराठा समाजाला एकत्र राहण्यासाठी विनंती केली. ते म्हणाले, "गरीब गरीब आणि श्रीमंत श्रीमंत होत चालला . त्याला आपण जबाबदार आहोत. मी जातीवादी नाही ,मी आरक्षण मागतोय. तुम्ही एकत्र आल्यामुळे मराठा समाजाला अख्ख जग आपल्याकडे पाहतेय. श्रीमंत मराठा पासून गरीब मराठा एकमेकांना सहकार्य करू लागलेत. मराठा समाज एकत्रित करणे हे सर्वात मोठे चॅलेंज माझ्यासमोर होतं. पण माझा परिवार महाराष्ट्रातील सहा कोटी मराठा समाज आहे. त्यांनी दिलेले योगदान वाया जाऊ देणार नाही."
जरांगे कधी मांडणार भूमिका?
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे मराठा आरक्षणाबाबत आणि विधानसभा निवडणूकांच्या बाबतीत जरांगे कधी भूमीका मांडणार? विधानसभेत किती उमेदवार उतरवायचे यासंदर्भात ते जी बैठक घेणार होते ती बैठक पुढे ढकलल्याने जरांगे त्यांची भूमिका कधी मांडणार? असा प्रश्न उपस्थित होत असून निवडणूकीच्या तारखा जाहीर झाल्यावर यावर भूमिका मांडणार असल्याचं मनोज जरांगे यांनी सांगितलं.
ओबीसीतून मराठा आरक्षणाच्या मागणीची वर्षपूर्ती
29 ऑगस्ट 2023 मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील पैठण फाटा या ठिकाणी जनआक्रोश आंदोलन सुरू केलं,याच दिवशी मनोज जरांगे यांनी दुपारी एक वाजेपर्यंत सरकारने निर्णय घ्यावा असे अल्टिमेट देत आमरण उपोषणाचा इशारा दिला.आणि 4 वाजत जवळच असलेल्या अंतरवली सराटी येथे त्यांनी आमरण उपोषणाला सुरवात केली