Manoj Jarange: आमच्या मागण्या पूर्ण करा, मराठा कुणबी एकच आहे, धनगर ,मुसलमान आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही असं म्हणत मनोज जरांगेंनी उपोषण थांबवण्याचा निर्णय तर घेतला पण सरकारकडे आरक्षणाचा तगादा सुरुच ठेवल्याचं दिसलं. मराठा आरक्षणासाठी सुरु केलेल्या उपोषणाला आता नऊ दिवस होत आले असून मनोज जरांगेंनी आता उपोषण थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. नारायणगडचे महंत शिवाजी महाराज आणि आंदोलकांच्या मदतीनं ते उपोषण सोडणार असून 'सलाईन घेऊन या मी उपोषण करू शकत नाही', असं जरांगे म्हणाले असले तरी आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नसल्याचं सांगत आरक्षण दिलं नाही तर आपण सत्तेत बसून आरक्षण घेणार असं ते म्हणाले. आचारसंहिता लागेपर्यंत राजकीय भाषा करणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं..


आचारसंहितेपर्यंत राजकीय भाषा करणार नाही..


आमच्या मागण्या पूर्ण करा,  मी राजकीय भाषा करणार नाही. नंतर कोण काय बोलले तर सांगतो. कोणाला सोडणार नाही असं जरांगे म्हणाले. एकदा मी राजकारणाकडे जायचं नाही म्हंटल तरी जाणार नाही असं म्हणत त्यानंतर कोण काय बोलले हे मी सांगतो. मी कोणाला सोडणार नसल्याचा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manjo Jarange Patil) यांनी दिला आहे. फडणवीस साहेब तुमच्या हाताने सत्ता पाडू नका, मी काहीच येऊ देणार नाही, नंतर बोंबलु नका असे जरांगे पाटील म्हणाले. एकदा मी राजकारणाकडे जायचं नाही म्हंटल तरी जाणार नाही असे ते म्हणाले. आरक्षण दिलं नाही तर आपण सत्तेत बसून आरक्षण घेणार असल्याचे जरांगे पाटील म्हणाले. 


श्रीमंत मराठे आपली पोर कधीच मोठ होऊ देणार नाहीत


माझ्या लोकांना मारहाण केली, पण माझं ऐकून त्यांनी मार खाल्ला. आरक्षण दिलं नाही तर आपण सत्तेत बसून आरक्षण घेणार असल्याचे जरांगे पाटील म्हणाले. सलाईन घेऊन ये मी उपोषण करू शकत नाही असे जरांगे पाटील म्हणाले. श्रीमंत मराठे आपली पोर कधीच मोठ होऊ देणार नाहीत. शेतकरी मराठा रात्रंदिवस चिखलात उन्हात काम करून आपलं लेकरु कधी नोकरीला लागेल याची वाट बघतो. मजूर मराठा देखील वाट बघतो. प्रत्येक पक्षातील मराठा वाट बघतो असे जरांगे पाटील म्हणाले. 


हेही वाचा:


मोठी बातमी! मनोज जरांगे उपोषण सोडणार, निवडणुकीची आचारसंहिता लागेपर्यंत वाट बघणार, देवेंद्र फडणवीसांना अल्टिमेटम