Maharashtra Politics नागपूर : लोकसभा निवडणुकीत दणका बसल्यानंतर आता भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी  (State Legislative Assembly Election 2024) चांगलीच कंबर कसली आहे. त्यासाठी भाजपचे  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) हे सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. अमित शाह (Amit Shah) यांनी बुधवारी नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरमधील भाजप नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले होते. यावेळी अमित शाह यांनी विधानसभा निवडणुकीत आपले प्रमुख उद्दिष्ट  सांगत भाजपच्या (BJP) सर्व स्थरातील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पूर्ण ताकदीने कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत.


दरम्यान, नागपुरातील (Nagpur) कविवर्य सुरेश भट सभागृहात भाजप कार्यकर्त्यांसोबतची संवाद बैठक संपवल्यानंतर अमित अमित शाहसुमारे अर्धा तास मुख्य व्यासपीठाच्या बाजूला असलेल्या खोलीत बसले होते. यावेळी त्यांनी विदर्भातील निवडक भाजप नेते आणि पदाधिकारी तसेच विधानसभा निवडणुकीसाठी शेजारील राज्यातून निवडणुकीचा काम सांभाळण्यासाठी बोलावलेले भाजप नेते यांची संयुक्त बैठक घेतली होती. या बैठकीत अमित शहा यांनी भाजप नेत्यांची जोरदार कानउघडणी केल्याची माहिती पुढे आली आहे.


आपापसातील हेवेदावे अजिबात  खपवून घेतले जाणार नाही- अमित शाह 


लोकसभा निवडणुकीच्या काळात झालेले आणि करण्यात आलेले दुर्लक्ष विधानसभा निवडणुकीत मुळीच खपवून घेतलं जाणार नाही, असं अमित शहा यांनी भाजप नेत्यांना म्हणाल्याची माहिती आहे. तसेच आपापसातील हेवेदावे ही खपवून घेतले जाणार नाही. असे समजू नका की इथे घडणाऱ्या गोष्टींची माहिती आमच्यापर्यंत पोहोचत नाही, अशी तंबी ही अमित शाहांनी यावेळी स्थानिक नेत्यांना दिल्याची माहिती आहे. विधानसभा निवडणुकांसाठी देण्यात आलेली जबाबदारी संबंधित नेत्याने चोखपणे बजवावी, असेही अमित शहा यांच्याकडून विदर्भातील स्थानिक नेत्यांना सांगण्यात आले आहे.


अमित शाह आज नाशिक आणि कोल्हापुरात भाजप नेत्यांना भेटणार


अमित शाह यांच्या महाराष्ट्र दौऱ्याचा आज दुसरा दिवस असून ते बुधवारी नाशिक आणि कोल्हापूरमधील भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. तत्पूर्वी आज सकाळी छत्रपती संभाजीनगरमध्ये अमित शाह यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चा केली. या दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाल्याचे सांगितले जाते. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अमित शाह महाराष्ट्रातील परिस्थितीचा आढावा घेत असल्याची सूत्रांची माहिती आहे.


आणखी वाचा