Manoj Jarange, जालना : "सत्ताधाऱ्यांनी गोरगरिबांना न्याय द्यायचा नाही ठरवलं आहे.  त्यामुळे गोरगरिबांनी ठरवलं आहे त्यांना खुर्ची द्यायची नाही. 20 तारखे पर्यंत चित्र बदललेले दिसत, देवेंद्र फडणवीस यांचे गणित फेल होणार आहे. मला हलक्यात घेऊ नका, मी एकदा राजकारणात घुसलो तर परिणामाची चिंता करत नाही", असं मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील म्हणाले. राजरत्न आंबेडकर यांनी जालन्यात मनोज जरांगेंची भेट घेतली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू राजरत्न आंबेडकर यांनी घेतली मनोज जरांगेंची भेट 


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू राजरत्न आंबेडकर यांनी घेतली मनोज जरांगेंची भेट घेतली. महाविकास आघाडी, महायुतीला लोक वैतागले आहेत, अशी प्रतिक्रिया राजरत्न आंबेडकर यांनी जरागेंची भेट घेतल्यानंतर दिली. सत्ता परिवर्तन व्हायला पाहिजे. गोरगरीब सामान्य लोकं विधानसभेत गेले पाहिजे, असंही राजरत्न आंबेडकर म्हणाले. 


आम्ही महाराष्ट्रात समीकरण घडवून आणत आहोत 


महाविकास आघाडी, महायुतीला लोक वैतागले आहेत, त्यामुळे सत्ता परिवर्तन व्हायला पाहिजे, अशी प्रतिक्रिया राजरत्न आंबेडकर यांनी दिलीय. आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची भेट घेतली. त्यांनतर ते माध्यमांशी बोलत होते. महायुती हटवली तर महाविकास आघाडी येते, महाविकास आघाडी हटवली तर महायुती येते असं म्हणत सत्ता परिवर्तन झालं पाहिजे असं राजरत्न आंबेडकर म्हणालेत. गोरगरीब सामान्य लोकं विधानसभेत गेले पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी बोलून दाखवलीय. आम्ही महाराष्ट्रात समीकरण घडवून आणत आहोत असं सांगत आमच्या अजून बऱ्याच बैठका बाकी आहेत असं देखील राजरत्न आंबेडकर म्हणाले आहेत. 


मनोज जरांगे म्हणाले, सत्ताधाऱ्यांनी गोरगरिबांना न्याय द्यायचा नाही ठरवलं आहे.  त्यामुळे गोरगरिबांनी ठरवलं आहे त्यांना खुर्ची द्यायची नाही. 20 तारखे पर्यंत चित्र बदललेले दिसत, देवेंद्र फडणवीस यांचे गणित फेल होणार आहे. मला हलक्यात घेऊ नका, मी एकदा राजकारणात घुसलो तर परिणामाची चिंता करत नाही.


महाविकास आघाडी, महायुतीला लोक वैतागले आहेत, अशी प्रतिक्रिया राजरत्न आंबेडकर यांनी जरागेंची भेट घेतल्यानंतर दिली. सत्ता परिवर्तन व्हायला पाहिजे. गोरगरीब सामान्य लोकं विधानसभेत गेले पाहिजे, असंही राजरत्न आंबेडकर यांनी सांगितलं. 


इतर महत्वाच्या बातम्या 


लाडकी बहीण योजनेच्या प्रसिद्धीसाठी 199 कोटींचा खर्च, मतांसाठी महाराष्ट्र विकायला पण कमी करणार नाहीत, वडेट्टीवारांनी जीआर ट्वीट करत आकडेवारी मांडली