सातारा : येथील प्रसिद्ध वैद्यकीय व्यावसायिक, लेखक आणि नास्तिकतावादी चळवळीचे बिनीचे शिलेदार डॉ. शंतनू शरद अभ्यंकर (वय 60) यांचे गुरुवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे आई-वडील, पत्नी, भाऊ, एक मुलगा एक विवाहित मुलगी असा परिवार आहे.


डॉ. अभ्यंकर यांची सातारा जिल्ह्यातील प्रख्यात स्त्री रोगतज्ञ, वक्ता, नाटककार, सामाजिक जाणीव असलेले विज्ञानवादी कार्यकर्ता म्हणून देखील सर्वत्र ओळख होती. वाई येथील प्राज्ञ पाठ शाळा मंडळाचे ते विश्वस्त तर लोकमान्य टिळक स्मारक संस्थेचे अध्यक्ष होते.


पाळी मिळी गुप चिळी, संभोग का सुखाचा, जादुई वास्तव्य रिचर्ड डॉकिंस, मला शास्त्रज्ञ व्हायचय, बायकात पुरुष लांबोडा, डॉक्टरांना भेटलेल्या खुमासदार माणसांबद्दल, डॉक्टर टेरेसा आणि इतर वल्ली,आधुनिक वैद्यकीची शोधगाथा, गरोदरपणात ग्रहण का पाळू नये आदी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. अलीकडेच त्यांनी लिहिलेल्या आधुनिक वैद्यकीची शोधगाथा, शास्त्रज्ञ आजीच्या गोष्टी, डॉ क्युटरस, राधिका सांत्वनमहे या चार पुस्तकांचे प्रकाशन झाले. याशिवाय विविध वृत्तपत्रे, नियतकालिके, समाज माध्यमांवरही ते सातत्याने लेखन करत होते.


लेखकासोबतच वक्ते, कथाकार, नाटककार, अनुवादक म्हणूनही त्यांची ओळख होती. २००७ मध्ये डॉ. आनंदीबाई जोशी गौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. याशिवाय शकुंतला परळकर सेवा व्रती डॉक्टर पुरस्कार, वाई वैद्यक भूषण पुरस्कारानेही त्यांना गौरविण्यात आलेले आहे.


इतर महत्वाच्या बातम्या


Jayant Patil : अजितदादा म्हणाले जय पवारांच्या उमेदवारीबाबत पार्लमेंटरी बोर्डामध्ये विचार होणार, जयंत पाटील म्हणाले, अजित पवार म्हणजेच पार्लमेंटरी बोर्ड