Manmohan Singh : देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. मनमोहन सिंह यांना 8 वाजताच्या सुमारास एम्सच्या इमर्जन्सी वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. मनमोहन सिंग यांच्या कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांना श्वासोच्छवासाचा त्रास होत असून त्यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आले आहे.
राहुल गांधींसह काँग्रेस नेते बेळगावहून दिल्लीला रवाना
दरम्यान, मनमोहन सिंह यांची प्रकृती बिघडल्याची माहिती मिळताच काँग्रेस नेते राहुल गांधी हे बेळगावहून दिल्लीला रवाना झाले आहेत. मल्लिकार्जुन खरगे देखील दिल्लीला रवाना झाले आहेत. याशिवाय काँग्रेसचे सर्व ज्येष्ठ आणि वरिष्ठ नेते देखील दिल्लीकडे निघाले आहेत. बेळगावमधील उद्या होणार असलेली रॅली देखील रद्द करण्यात आली आहे. सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी एम्स रुग्णालयात दाखल झाले आहेत.
आताच्या माहितीनुसार माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची प्रकृती अतिशय गंभीर आहे. याचवेळी गांधी कुटुंबाचे जावई यांनी मनमोहन सिंह यांच्या प्रकृतीबाबत ट्वीटरवरुन माहिती दिली आहे. अशोक गेहलोत यांच्याकडून देखील मनमोहन सिंह यांच्या प्रकृतीबाबत प्रार्थना केली जात आहे.
मनमोहन सिंग 92 वर्षांचे असून त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 22 मे 2004 रोजी मनमोहन सिंग हे देशाचे 13 वे पंतप्रधान बनले होते. त्यानंतर ते सलग दहा वर्षं देशाचे पंतप्रधान राहिले.
Manmohan Singh Admitted Hospital | माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांची प्रकृती खालावली, उपचार सुरू
इतर महत्त्वाच्या बातम्या