नवी दिल्ली : मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यात पश्चिम बंगालमधील लोकसभेच्या तीन जागांवर मतदान होणार आहे. त्याआधी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांचे खरे नाव ‘मुमताज मसामा खातून’ असल्याचा दावा करण्यात येत आहे. ममता बॅनर्जी यांची मुस्लिम म्हणून धार्मिक ओळख सिद्ध करणे हा या पोस्टचा उद्देश आहे.


विश्वास न्यूजने त्याचा सखोल तपास केला. ममता बॅनर्जी यांचे खरे नाव ममता बॅनर्जी असून त्यांची धार्मिक ओळख हिंदू आणि जात ब्राह्मण आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारी पोस्ट ही ममता बॅनर्जी यांच्या विरोधात अफवा परसवण्याच्या उद्देशाने शेअर केली जात आहे. 


व्हायरल म्हणजे काय?


सोशल मीडिया यूजर 'राजेश भारद्वाज' यांनी एक व्हायरल इन्फोग्राफिक्स शेअर केले आहेत. त्यामध्ये ममता बॅनर्जी यांचे खरे नाव 'मुमताज मसामा खातून' असल्याचे समोर आले आहे.




खरं काय आहे? 


ममता बॅनर्जी पश्चिम बंगालच्या भवानीपूर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आहेत आणि 2021 च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान, त्यांनी या जागेवरून आपला उमेदवारी अर्ज (फॉर्म 2B) दाखल केला होता. त्यामध्ये त्यांनी ममता बॅनर्जी असं त्यांचं नाव नमूद केले आहे. प्रतिज्ञापत्रानुसार त्याच्या वडिलांचे नाव प्रोमिलेश्वर बॅनर्जी आहे.




'हिंदुस्तान टाईम्स'चा 14 डिसेंबर 2021 रोजीचा एक अहवाल सांगतोय की, ममता बॅनर्जी यांनी भारतीय जनता पक्षाला प्रत्युत्तर देत म्हटले होते की, मी एक ब्राह्मण आहे आणि भाजपच्या प्रमाणपत्राची मला गरज नाही. 


इतर अनेक अहवालांमध्येही याचा उल्लेख आहे, त्यामध्ये ममता बॅनर्जी यांची धार्मिक ओळख हिंदू आहे आणि ब्राह्मण ही त्यांची जात ओळख आहे.


बंगालच्या दार्जिलिंग, रायगंज आणि बालूरघाट या एकूण तीन लोकसभा जागांसाठी 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे.


 






(डिस्क्लेमर: ही बातमी पहिल्यांदा  vishvasnews.com वर प्रकाशित झाली होती. Shakti Collective चा तो एक भाग आहे. एबीपी माझानं त्याचं भाषांतर करुन वृत्त प्रकाशित केलं असून मूळ बातमीचा अर्थ बदलेलं कोणताही बदल केलेला नाही).


ही बातमी वाचा: