नवी दिल्ली (विश्वास न्यूज) : सोशल मीडियावर क्रिकेटर महेंद्रसिंह धोनीचा एक फोटो वेगात व्हायरल होत आहे. त्या फोटोसह दावा केला जात आहे की मतदान करण्यासाठी गेलेल्या धोनीनं काँग्रेसला मतदान केलं आहे. धोनीनं हात दाखवून ती गोष्ट दाखवून लोकांना काँग्रेसला मतदान करण्याचं अपील केल्याचा दावा फोटोसह  केला जातोय. 


विश्वास न्यूजनं केलेल्या पडताळणीत धोनीच्या व्हायरल फोटोसह करण्यात आलेला दावा चुकीचा आहे हे समोर आलं. व्हायरल फोटो 2020 मधील आहे. चेन्नई सुपर किंग्जनं हा फोटो त्यावेळी ट्विटर आताचे एक्सववर साठ लॉख फॉलोअर पूर्ण झाल्यावर पोस्ट केला होता. धोनीच्या फोटोतून मतदानाचा इशारा करण्यात येत नसून तो बोटांनी साठ लाख फॉलोअर्स झाल्याबद्दलचा इशारा करत आहे. व्हायरल फोटोचा लोकसभा निवडणूक 2024 शी कसलाही संबंध नाही.


काय व्हायरल होत आहे?


फेसबुक यूजर जितेंद्र श्रीवास्तव विपुलनं 19 एप्रिल 2024 ला एक फोटो शअर करुन लिहिलं की,"एक मत पंजाला दिल्यानंतर महेंद्रसिंह धोनी प्रसन्न भावमुद्रेत."


पोस्टची अर्काईव्ह लिंक इथं पाहा



एका दुसरा युजर (अर्काइव्ह लिंक) धर्मेंद्र आचार्य नं व्हायरल फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं की"आता इथं धोनी पण मतदान केल्यावर काय इशारा करतो, काही भक्त चिडले तर यामध्ये कोणतं तरी विदेशी कनेक्शन जोडतील, जय काँग्रेस, विजय काँग्रेस."



पडताळणी


व्हायरल फोटोची सत्यता समोर येण्यासाठी आम्ही फोटोला गुगल रिव्हर्स इमेजद्वारे सर्च केला. व्हायरल फोटो (अर्काइव्ह लिंक) एनडीटीव्हीच्या वेसाईटवर प्रकाशित झालेल्या एका बातमीत आढळला. ती बातमी 5 ऑक्टोबर 2020 प्रकाशित केली गोली होती. त्या बातमीनुसार ट्विटरवर(एक्स) चेन्नई सुपर किंग्जनं साठ लाख फॉलोअर्सचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर धोनीनं फॉलओअर्सना शुभेच्छा दिल्या होत्या. फोटोत मतदान केल्यानं बोटांवर जी शाई लावली जाते ती देखील दिसत नाही. 



पडताळणीची प्रक्रिया पुढे नेण्यासाठी आम्ही चेन्नई सुपर किंग्जच्या सोशल मीडिया अकाऊंटसची तपासणी सुरु केली. व्हायरल फोटो आम्हाला एक्स (अर्काइव्ह लिंक) आणि इन्स्टाग्राम (अर्काइव्ह लिंक) वर आढळली. संबंधित फोटो 5 ऑक्टोबर 2020 रोजी शेअर करण्यात आला होतं. उपलब्ध असलेल्या माहितीनुसार साठ लाख फॉलोअर्स झाल्यांनतर सहा बोटं दाखवतानाचा धोनीचा एक फोटो शेअर करुन चाहत्यांचे चेन्नईला फॉलो करण्याऱ्यांचं आभार मानण्यात आले. 


अधिक माहितीसाठी आम्ही क्रीडा पत्रकार सय्यद हुसेनशी संपर्क साधला होता, त्यावेळी त्यांनी फोटो जुना असून निवडणुकीशी संबंधित नसल्याचं सांगितलं. 


अखेर चुकीच्या दाव्यासह फोटो शेअर करणाऱ्या यूजरचं खातं स्कॅन करण्यात आलं. यामध्ये तो एका विचारधारेशी संबंधित पोस्ट शेअर करत असल्याचं समोर आलं. त्या यूजरला पाच हजार नेटकरी फॉलो करतात.


निष्कर्ष :विश्वास न्यूजच्या पडताळणीत असं समोर आलं की धोनीच्या व्हायरल फोटोसह केला जाणारा दावा चुकीचा आहे. व्हायरल फोटो 2020 मधील आहे. चेन्नई सुपर किंग्जनं हा फोटो त्यावेळी साठ लाख फॉलोअर्स पूर्ण झाल्यानंतर ऑक्टोबर 2020 शेअर केला होता. धोनीच्या फोटोत इशारा हा मतदानाचा नसून तो सहा बोटांनी साठ लाख फॉलोअर्सचा इशारा  करत आहेत. या फोटोचा लोकसभा निवडणुकीची कोणताही संबंध नाही. 


[(डिस्क्लेमर: ही बातमी पहिल्यांदा  Vishwas News वर प्रकाशित झाली होती. Shakti Collective चा तो एक भाग आहे. एबीपी माझानं त्याचं भाषांतर करुन वृत्त प्रकाशित केलं असून मूळ बातमीचा अर्थ बदलेलं कोणताही बदल केलेला नाही)..]