अकोला : अकोला पश्चिम मतदारसंघात भाजपच्या पराभवानंतर आता भाजपनं पक्षांतर्गत मोठी कारवाई केली आहे. अकोला पश्चिम मतदारसंघात भाजपचे माजी महापौर विजय अग्रवाल यांचा काँग्रेसच्या साजिदखान पठाण यांनी 1293 मता़नी पराभव केला आहे. या मतदारसंघात 1995 पासून सातत्याने 30 वर्ष भाजपचा आमदार विजयी झाला होता. भाजपने पराभवाचा ठपका ठेवत सात पदाधिकाऱ्यांचं पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबन केलं आहे. यामध्ये माजी राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटलांच्या पुतण्यासह माजी महापौर पती आणि माजी नगरसेवकांचा समावेश आहे. निलंबित केलेल्या लोकांमध्ये माजी गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांचा पुतण्या आणि नगरसेवक आशिष पवित्रकार, माजी महापौर अश्विनी हातवळणे यांचे पती आणि माजी नगरसेवक प्रतुल हातवळणे यांचा समावेश आहेयॉ. याशिवाय माजी नगरसेवक हरीभाऊ काळे, भाजयुमोचे माजी महानगरअध्यक्ष उमेश गुजर, राजू टाकळकर आणि सौरभ शर्मा यांचा समावेश आहे.
1995 सालापासून भाजपच्या ताब्यात असलेला अकोला पश्चिम मतदारसंघ हातातून निसटला. या मतदारसंघात भाजपचे माजी महापौर विजय अग्रवाल यांचा काँग्रेसच्या साजिदखान पठाण यांनी 1293 मता़नी पराभव केला. त्यानंतर या पराभवाचा ठपका ठेवत आता भाजपने कारवाई करत काहींना निलंबित केलं आहे.
विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवत भाजपच्या सात पदाधिकाऱ्यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निष्कासित करण्यात आले आहे. या अगोदर याच कारणास्तव विधानसभेत बंडखोरी करीत उमेदवारी दाखल केलेल्या माजी शहराध्यक्ष डॉ. अशोक ओळंबे आणि माजी नगराध्यक्ष हरीश आलिमचंदानी यांना पक्षातून निलंबित करण्यात आलं होतं. दरम्यान, ही कारवाई म्हणजे पक्षातील स्थानिक एकाधिकारशाही असल्याचा आरोप काही निलंबित पदाधिकाऱ्यांनी केला आहे. यासंदर्भात पक्षश्रेष्ठींची भेट घेऊन न्याय मागणार असल्याचं यातील अनेकांनी स्पष्ट केलं आहे.
निलंबित करण्यात आलेले भाजप पदाधिकारी
1) आशिष पवित्रकार : माजी नगरसेवक
2) प्रतुल हातवळणे : माजी महापौर पती आणि माजी नगरसेवक
3) गिरीष गोखले : माजी नगरसेवक
4) हरीभाऊ काळे : माजी नगरसेवक
5) उमेश गुजर : भाजयुमो माजी शहराध्यक्ष
6) सौरभ शर्मा : पदाधिकारी
7) राजू टाकळकर : पदाधिकारी
साजिद खान पठाण यांचा 1293 मतांनी विजय
साजिद खान पठाण यांनी आपली ताकद दाखवली. त्यांचा 1293 मतांनी विजय झाला. अकोला पश्चिम मतदारसंघाची स्थापना 2008 साली झाली होती. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 च्या निवडणुकांमध्ये भाजपचे गोवर्धन शर्मा यांनी सलग तीन वेळा विजय मिळवला. त्यांच्या निधनानंतर 2023 मध्ये हा मतदारसंघ भाजपसाठी मोठे आव्हान बनला. 2019 च्या निवडणुकीत गोवर्धन शर्मा यांनी काँग्रेसचे साजिद पठाण यांना फक्त 2593 मतांनी पराभूत केले होते.