Mahesh Gaikwad : कल्याण पूर्वेतील शिंदे गटाचे शहरप्रमुख आणि माजी नगरसेवक महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्यावर खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. मुंबईतील बांधकाम व्यावसायिकाने पाच कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप करत उल्हासनगरमधील हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय. न्यायालयाच्या आदेशाने हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. पोलिसांनी महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्यासह मलंगवाडी येथील चार ग्रामस्थांवर खंडणी, दमदाटीचे गुन्हे दाखल केले आहेत.
न्यायालयाच्या आदेशांमुळे गुन्हा दाखल
नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर येथील पारसिक हिल भागात राहणारे बांधकाम व्यावसायिक सदृध्दीन बशर खान यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात बांधकाम व्यावसायिकांनी कोर्टात धाव घेतली होती. कोर्टाने या प्रकरणात पुराव्याच्या आधारे उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानंतर पोलिसांनी महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्यासह मलंगवाडी येथील चार ग्रामस्थांवर खंडणी, दमदाटीचे गुन्हे दाखल केले. आरोपींमध्ये महेश गायकवाड (Mahesh Gaikwad), यशवंत मुका फुलोरे, रोहिदास मुका फुलोरे, गणेश यशवंत फुलोरे, शेवंतीबाई मुका फुलोरे यांचा समावेश आहे.
खंडणी मागितल्याचा प्रकार कधी घडला?
महेश गायकवाड यांचे हे प्रकरण ऑगस्ट 2023 नोव्हेंबर 2023 या कालावधीतील आहे. गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्यावर नोव्हेंबर 2023 मध्ये खंडणी मागितल्याचा आरोप आहे. बांधकाम व्यावसायिकांची एफएस ग्रुप ऑफ कंपनीज ही बांधकाम कंपनी आहे. डिस्चार्ज मिळाल्यानंतर काही आठवड्यांतच आता महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर केला होता गोळीबार
भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्यावर गोळीबार केला होता. त्यानंतर महिनाभराच्या कालावधीनंतर महेश गायकवाड यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. दरम्यान, डिस्चार्ज मिळाल्यानंतर काही आठवड्यांतच आता महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. काही महिन्यांपूर्वी राहुल पाटील यांनी पनवेल हिंद केसरी बैलगाडा शर्यतीत सहभाग घेतला होता. या शर्यतीत राहुल पाटील यांचा बैल मथुर शर्यत हरला. त्यामुळे मोठा राडाही झाला होता. शिवाय यावेळीही गोळीबार करण्यात आला होता. त्यानंतर पनवेल पोलिसांनी गुन्हा दाखल करून राहुल पाटील याला अटक केली.
इतर महत्वाच्या बातम्या