MP List of Maharashtra:  राज्यात लोकसभा निवडणुकांचे वारे वाहायला लागले आहे. जवळजवळ सर्वच पक्षांनी त्यासाठी कंबर कसली असून जोरदार तयारी सुरू केली आहे.  विदर्भ (Vidarbha) हा राज्यासह देशाच्या राजकारणाला एक वेगळी दिशा देणार ठरला आहे. राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आणि दीक्षाभूमी असे दोन प्रमुख वैचारिक केंद्र असलेला हा मतदारसंघ परंपरागतरित्या काँग्रेसचा (Congress)  बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असे. मात्र 2014 नंतर देशात झालेले राजकीय परिवर्तन आणि नागपूरला  नितीन गडकारींसारखा(Nitin Gadkari) दिग्गज नेता मिळाल्यानंतर नागपूरकर मतदारांनी भाजपला (BJP) भक्कम साथ दिली आहे.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले (Nana Patole) यांचा तब्बल 2,16,009 मतांनी पराभव केला होता. 2014 च्या तुलनेत गेल्या निवडणुकीत त्यांचे मताधिक्य काहीसे घटले होते. 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप 303 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला होता. विदर्भात सर्वच निवडणुकांमध्ये कायमच भाजप विरुद्ध काँग्रेस अशी दुहेरी लढत पहायला मिळते. 

महाविकास आघाडीच्या बैठकीत राज्यातील लोकसभेच्या 48 पैकी 40 जागांवर कोणता पक्ष निवडणूक लढवणार हे जवळपास फायनल झाल्याचं सांगण्यात आलं. तर उर्वरित 8 जागांचा तिढा अद्याप कायम आहे. या जागांमध्ये रामटेक, हिंगोली, वर्धा, भिवंडी, जालना आणि शिर्डी यांचा समावेश आहे. जिथे शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस दावा करत आहेत.  याशिवाय काँग्रेस पक्ष मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघ आणि मुंबई उत्तर पश्चिमच्या जागा मागत आहे. मात्र 2019 मध्ये दोन्ही जागांवर शिवसेना विजयी झाली होती.

उद्धव ठाकरे गट दोन्ही जागा सोडण्यास तयार नाही. महाराष्ट्रात 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीने सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या. भाजपला 23, शिवसेना 18, राष्ट्रवादी काँग्रेस 4, काँग्रेस 1, MIM 1 आणि अपक्ष 1 अशा जागा जिंकल्या होत्या.  आता भाजप शिवसेना पूर्वीची युती तुटून नव्याने झाली, शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष फुटले आहेत. त्यामुळे येत्या निवडणुकीत चित्र कसे असेल हे पाहणं महत्वाचं असेल.


विदर्भातील  खासदारांची यादी |   (Vidarbha MP List )

मतदारसंघ  विजयी उमेदवार    पक्ष     सध्या कोणाच्या बाजूने?
नागपूर  नितीन गडकरी      भाजप  
बुलडाणा    प्रतापराव जाधव    शिवसेना         शिंदे गट
अकोला     संजय धोत्रे            भाजप   
अमरावती नवनीत कौर राणा  राष्ट्रवादी   
वर्धा   रामदास तडस   भाजप   
रामटेक  कृपाल तुमाणे         शिवसेना  शिंदे गट 
भंडारा-गोंदिया सुनील मेंढे भाजप   
गडचिरोली-चिमूर अशोक नेते भाजप   
चंद्रपूर   बाळू धानोरकर काँग्रेस  रिक्त 
यवतमाळ - वाशिम भावना गवळी शिवसेना  शिंदे गट 

राज्यातील लोकसभेच्या 48 जागांपैकी महाविकास आघाडीत आतापर्यंत झालेली चर्चा आणि तिढा असलेल्या एकूण जागा

  • काँग्रेस - 14
  • ठाकरे गट - 17 (15 + 2) (यामध्ये वंचित 1 आणि स्वाभिमानीला 1 जागा)
  • राष्ट्रवादी काँग्रेस -9
  •  तिढा असलेल्या जागा - 8 

इतर महत्वाच्या बातम्या