Eknath Shinde on Ravindra Waikar : "महायुतीच्या निर्णयांचा रवींद्र वायकर यांच्यावर परिणाम झालाय. याचा मला आनंद वाटतोय. देशात विकासाचं पर्व आहे, जगभरात आदरानं नाव देशाचं घेतलं जातं. मतदारांना न्याय देणं अपेक्षित असतं, प्रश्न सोडवणे आवश्यक असतं म्हणून त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवलेला आहे",असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. ईडीच्या कचाट्यात सापडलेले ठाकरे गटाचे नेते रवींद्र वायकर यांनी आज (दि.10) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित शिंदे गटात प्रवेश केला. मुंबईत हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी ते बोलत होते. 


वायकर यांचे काम केवळ मतदार संघापुरते मर्यादित नाही


एकनाथ शिंदे म्हणाले, रवींद्र वायकर आज खऱ्या शिवसेनेत आलेले आहेत. मी काय ते काय गजाभाऊ काय..आम्ही शिवसेनेचं काम बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली लोकांपर्यंत पोहोचवण्याचं  गेले अनेक वर्षांपासून करतोय. रवींद्र वायकर यांचा संपूर्ण परिवार देखील आज इथे आहे. त्यांनी आपल्या मतदार संघातले प्रश्न मला बैठकीत सांगितलेले आहेत. त्यांचे काम केवळ मतदारसंघापुरते मर्यादीत नाही. तर त्यांना मुंबई पालिकेची खडा न खडा माहिती आहे. 


आमच्यात तिसराच व्यक्ती संभ्रम निर्माण करत होता


पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, काही लोकं आमच्यातला संभ्रम करत होते. आज त्यांचाही संभ्रम दूर झाला आणि माझाही संभ्रम दूर झाला. आमच्यात तिसराच व्यक्ती संभ्रम निर्माण करत होता. जाऊ द्या आज राजकीय बोलत नाही. दीड वर्षात सरकारनं अनेक लोकाभिमुख निर्णय घेतलेत. राज्यकर्त्यांनी लोकांसाठी चांगले दिवस कसे येतील ह्या गोष्टी लक्षात ठेवत निर्णय घ्यायचे असतात. आपलं पुरोगामी राज्य आहे प्रगत राज्य आहे आणि आम्ही पुढे नेण्याचं काम करतोय. 


पक्ष प्रवेशानंतर रवींद्र वायकर काय म्हणाले? 


"गेली ५० वर्ष मी शिवसेनेत काम केलं. जोगेश्वरीतील दंडली पासून पडेल ते काम केलं. चार वेळेस नगरसेवक झालो. तीनदा आमदार झालो. परंतू आत्ता इथे पक्षप्रवेश करतोय त्याचं कारण वेगळं आहे. पहिले कोव्हिडमध्ये कामं झाली नव्हती. आरेत मला ४५ किलोमीटरच्या रस्त्यांसाठी पैसे पाहिजेत. एनडी झोन देखील माझ्या मतदारसंघात आहेत. काही प्रश्न सत्तेत असल्याशिवाय सोडवले जात नाहीत. देशात मोदींची सत्ता आहे, मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे देखील चांगलं काम करतायत", असं रवींद्र वायकर पक्ष प्रवेश करताना म्हणाले आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Ravindra Waikar: जीवाभावाच्या सहकाऱ्यांची साथ सोडण्यापूर्वी रवींद्र वायकर गणपतीच्या दर्शनाला, उद्धव ठाकरेंचा विषय निघताच डोळे पाणावले