सिंधुदुर्ग : महाराष्ट्रात सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना, भाजप आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आहे. महायुतीचं तीन पक्षांचं सरकार सध्या राज्यात सत्तेत आहे. राज्यपातळीवर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे तिन्ही नेते त्यांच्यात वाद होणार नाही याची काळजी घेतात. मात्र, स्थानिक पातळीवर अजून देखील महायुतीच्या नेत्यांमध्ये खडाजंगी होत असल्याचं चित्र पाहायला मिळतं. असाच एक प्रकार कोकणत घडला आहे. सावंतवाडीमध्ये भाजपचे राजन तेली आणि शिवसेना मंत्री दीपक केसरकर यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या आहेत.  


सावंतवाडीत महायुतीत कलगीतुरा रंगल्याच चित्र पहायला मिळत आहे. महायुतीतील दोन नेते आरोप प्रत्यारोपाच्या फैरी एकमेकांवर झाडत आहेत. दीपक केसरकर यांनी गेल्या पंधरा वर्षात विकास केला नाही. त्यामुळे आता नवा आमदार हवा असं राजन तेलीनी युतीच्या नेत्यांना सांगितलं. तर, कृष्ण कृत्य करणारी लोक इथे येऊन उघडपणे आपण कोणतरी सज्जन असल्याचा आव आणतात, पण यांना मी जेलमध्ये बघितले आहे अशी प्रतिक्रिया दीपक केसरकर यांनी राजन तेलींच्या आरोपाला उत्तर देताना दिली आहे.


विकास हवा तर आमदार नवा, राजन तेलींची घोषणा 


निवडणुका आला की घोषणांचा पाऊस पडतो. दोन दिवसात आचारसंहिता लागेल. मात्र, या अगोदर दिलेल्या घोषणा आतापर्यंत पूर्ण झालेल्या नाहीत.  आता नव्याने खोट्या घोषणा देणारे कोण आहेत हेच त्या स्टेटस मधून सांगितलं. सावंतवाडी मतदारसंघात विकास व्हायचा असेल तर आमदार नवा असला पाहिजे. त्यामुळे युतीच्या नेत्यांना हात जोडून विनंती केली की उमेदवार बदला. आमचा युतीला विरोध नाही अशी प्रतिक्रिया माजी आमदार राजन तेली यांनी दिली.


दीपक केसरकर यांचा हल्लाबोल


दीपक केसरकर यांनी कृष्ण कृत्य करणारी लोक इथे येऊन उघडपणे आपण कोणतरी सज्जन असल्याचा आव आणतात. यांना मी जेलमध्ये बघितले आहे, खुनाच्या आरोपाखाली बघितलेला आहे. माझ्या सभ्यतेचा अंत त्यांनी पाहू नये. लोकांनी अशा अपप्रवृत्ती पासून सावधान राहिलं पाहिजे, असं दीपक केसरकर म्हणाले. कोणी माझी मुद्दामहून बदनामी करणार असेल, तर ती कदापिही सहन करणार नाही. दोडामार्ग मध्ये विकासाची गंगा येणार असल्याच यावेळी दीपक केसरकर यांनी सांगितलं. वाटेल ते बोलून माझ्यासारखी युवा नेते, चांगली लोकं राजकारणातून बाजूला जातील अशी स्थिती निर्माण करू नका, असं दीपक केसकर म्हणाले.


इतर बातम्या :


Raj Thackeray: दसऱ्याला उद्धव ठाकरेंसोबत 'राज'वाणीचा आवाजही घुमणार, आज वृत्तपत्रांच्या फ्रंट पेजला जाहिराती, उद्या पॉडकॉस्ट


Pankaja Munde Beed: भगवान गडावर पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याची जोरदार तयारी, धनुभाऊ पहिल्यांदाच पंकजाताईंसोबत व्यासपीठावर