सातारा : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) हंगामात सध्या सातारा (Satara) हा मतदारसंघ चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. कारण हा मतदारसंघ सत्ताधारी महायुती (Mahayut) आणि विरोधी बाकावरील महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) यांच्यासाठी फार महत्त्वाचा आहे. ही जागा जिंकण्यासाठी खासदार शरद पवार (Saharad Pawar) यांनी दंड थोपटले आहेत. तर दुसरीकडे महायुतीचे संभाव्य उमेदवार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) हेदेखील जोमात प्रचाराला लागले आहेत. ते समर्थनासाठी साताऱ्यातील वेगवेगळ्या नेत्यांच्या भेटी घेत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी नुकतंच कधीकाळचे आपले राजकीय विरोधक असलेल्या शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर पुढच्या दौऱ्यावर निघण्याआधी उदयनराजे यांनी शिवेंद्रसिंहराजे (Shivendra Raje Bhosale) यांचा प्रेमाने मुका घेतला आहे. 


शिवेंद्रसिंहराजे-उदयनराजे यांच्यात वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा


उदयनराजे भोसले यांनी आज आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेतली. शिवेंद्रसिंहराजे आणि उदयनराजे हे दोन्ही नेते राजघराण्यातून येतात. मात्र साताऱ्याच्या राजकारणात असे अनेक प्रसंग आहेत, ज्यावेळी त्यांनी एकमेकांच्या विरोधात भूमिका घेतली आहे.  आता लोकसभेची निवडणूक लागली आहे. महायुतीकडून साताऱ्यात उदयनराजे यांना तिकीट मिळण्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. त्यामुळे ते लोकांशी संपर्क साधत आहेत. साताऱ्यातील नेत्यांच्याही ते भेटी घेत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी आज शिवेंद्रराजे यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा झाली. ही भेट झाल्यानंतर दोन्ही नेते हसत-हसत बाहेर पडले. 


शिवेंद्रसिंहराजेंचा घेतला मुका  


विशेष म्हणजे पुढच्या प्रवासाला जाण्याआधी उदयनराजे भोसले यांनी शिवेंद्रसिंहराजे यांची गळाभेट घेतली. तसेच शिवेंद्रसिंहराजेंच्या गालाचा प्रेमाने मुका घेतला. उदयनराजेंच्या या कृतीमुळे शिवेंद्रसिंहराजेंच्या चेहऱ्यावर हसू फुटले. पुढे उदयनराजेंनी शिवेंद्रसिंहराजेंना उद्देशून तुझी दाढी टोचली ना, असं मिश्किल विधान केलं. या प्रसंगाची सगळीकडे चर्चा होत आहे. 


पाहा व्हिडीओ :



श्रीनिवास पाटलांची माघार


दरम्यान, साताऱ्यात महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील हे निवडणूक लढवणार होते. मात्र त्यांनी ऐनवेळी माघार घेतली. पाटलांच्या या निर्णयामुळे आता महाविकास आघाडी उदयनराजेंच्या विरोधात नेमकं कोणाला उतरवणार? असे विचारले जात आहे. शरद पवारांनी साताऱ्याची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. 2019 सालीदेखील भर पावसात सभा घेऊन त्यांनी उदयनराजेंना चारी मुंड्या चित केलं होतं. त्यामुळे यावेळी काय होणार? असे विचारले जात आहे. 


हेही वाचा >>


उदयनराजेंच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांचा स्वॅग, थाटात उडवली कॉलर, साताऱ्यात निवडणुकीची कुस्ती रंगणार!