पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघातून (Baramati Lok Sabha Election 2024) शिंदे गटाचे नेते (Shinde Group) विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी अखेर माघार घेतली आहे. यामुळे उपमुख्मंत्रई अजित पवार यांच्यासह सुनेत्रा पवारांना दिलासा मिळाला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत बारामतीतून लढणार नसल्याचं विजय शिवतारे यांनी जाहीर केलं आहे. एकनाथ शिंदेंसाठी पुरंदरचा तह करतोय,नियतीने दिलेली असाईनमेंट बाजूला ठेवत बारामतीमधून माघार घेत असल्याचं विजय शिवतारेंनी जाहीर केलं आहे.


विजय शिवतारेंची बारामतीमधून माघार


विजय शिवतारे यांनी पत्रकार परिषद घेत ही मोठी घोषणा केली आहे. शिवतारेंनी यावेळी म्हटलं की, 10 मार्चच्या कार्यक्रमावेळी मी बारामतीतून लढण्याची माझी इच्छा झाली होती. मतदारांना त्यांच्या हक्काचा उमेदवार द्यावा, या हेतून मी निवडणूक लढणार होतो. गेले 15 दिवस ही निवडणूक कोणत्याही प्रकारे लढायची, या निर्णयावर आम्ही होतो. कार्यकर्त्यांचा रोष दिसून येत होता. त्यानंतर कार्यकर्त्यांसोबत चर्चा झाली. सर्व मतदारसंघातील लोकांचा या लढ्याला पाठिंबा होता.


शिवतारेंच्या या मागण्या मान्य


जर मी आमदार असतो, तर मतदारसंघातील प्रलंबित काम पूर्ण केली असती. मु्ख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर पुरंदरच्या तहाप्रमाणे ऐतिहासिक तह करत आहे. गुंजवणी धरण, भोर साठी महत्वाची असलेल्या तीन उपसा सिंचन, आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी हस्तगत करण्यात येणाऱ्या जमिनीसाठी स्वेच्छा खरेदी जाहीर करा, दिवे येथे 200 एकरवर राष्ट्रीय बाजार उभारा, फुरसुंगी-उरुळी देवाची इथं नगरपरिषद निर्माण करावी, दुष्काळग्रस्त भागासाठी वरदायिनी ठरणारी पुरंदर उपसा योजनेसाठी तातडीनं निधी मिळण्याच्या मागण्या मान्य झाल्या आहेत.


अजित पवारांवर केलेले आरोप मागे घेताना, विजय शिवतारेंची गोची


बारामती लोकसभेच्या आखड्यातील विजय शिवतारे विरुद्ध अजित पवार ही कुस्ती फेल ठरली. अखेर शिवतारेंनी स्वतःचं बंड थंड केलं. त्यानंतर गेली पंधरा दिवस अजित पवारांवर केलेल्या आरोपांना मागे घेताना, शिवातरेंची मोठी गोची झाली. बारामती लोकसभेचा सात बारा अजित पवारांच्या नावे करायला तयार झालेल्या शिवतारेंनी एबीपी माझाच्या प्रश्नांना मात्र टाळलं.


या कारणामुळे विजशिवतारेंची माघार


माझ्यामुळे मुख्यमंत्र्यांना अडचण नको म्हणून निर्णय घेतला. आपल्याला आपल्या मुख्यमंत्र्यांना सांभाळायचं आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये विजय शिवतारे ऐकत नाही म्हणून महायुतीतील वरिष्ठ नेत्यांकडून काही गैरसमज झाले, तर ते चालणार नाही. मुख्यमंत्री शिंदेंना अडचण नको म्हणून आणि नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्याचं  स्वप्न पूर्ण करायचं आहे, त्यामुळे मी माघार घेतोय, असं शिवतारेंनी सांगितलं आहे.


पाहा व्हिडीओ : काय म्हणाले विजय शिवतारे ?



महत्त्वाच्या इतर बातम्या 


Vijay Shivtare : एक फोन आणि विजय शिवतारेंनी निर्णय बदलला; यु-टर्न घेण्यामागचं कारण मुख्यमंत्री