Mahavikas Aaghadi Seat Sharing : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला समोर आला आहे. मात्र, शेवटच्या क्षणापर्यंत महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. कारण महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी 5 ठिकाणी दोन उमेदवार दिले आहेत. 


उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून 96 जणांना एबी फॉर्म वाटप


शिवसेना ठाकरे गटाकडून 96 उमेदवारांनी  विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. शिवसेना ठाकरे गटाकडून एकूण 96  एबी फॉर्म वाटप करण्यात आले आहेत. त्यानुसार उमेदवारी अर्ज आज शेवटच्या दिवसापर्यंत दाखल करण्यात आले आहेत. 


महाविकास आघाडी जागा वाटपाचा फॉर्म्युला 


शिवसेना UBT =  96
काँग्रेस =  102
राष्ट्रवादी SP =  87


या तीन पक्षांच्या मिळून 285 जागा होतात. यात 5 ठिकाणी दोन पक्षांनी एकमेकांविरोधात उमेदवार दिलेत.म्हणजे 280 जागांवर हे तीन पक्ष एकत्रितपणे लढणार आहेत. ऊर्वरीत 8 या जागा मित्र पक्षांसाठी सोडल्याचे दिसतंय.


महाविकास आघाडीमध्ये ज्या ठिकाणी दोन पक्षांनी  अर्ज भरले आहेत


मिरज -


शिवसेना ठाकरे गट -तानाजी सातपुते 
काँग्रेस - मोहन वनखंडे 


सांगोला - 


शिवसेना ठाकरे गट दीपक आबा साळुंखे  
शेकाप - बाबासाहेब देशमुख 


दक्षिण सोलापूर 


काँग्रेस - दिलीप माने 
शिवसेना ठाकरे गट - अमर पाटील 


पंढरपूर 


काँग्रेस भागीरथ भालके 
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष अनिल सावंत 


परांडा 


शिवसेना ठाकरे गट रणजीत पाटील  
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष -राहुल मोटे 


दिग्रस 


शिवसेना ठाकरे गट  - पवन जैस्वाल 
 काँग्रेस -माणिकराव ठाकरे


काँग्रेसने एबी फॉर्म न दिल्याने माने समर्थकांचा संताप 


सोलापूर दक्षिणच्या जागेवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने अमर पाटील यांना उमेदवारी दिली होती. त्याच जागेवर काँग्रेस नेते आणि माजी आमदार दिलीप माने इच्छुक होते. काँग्रेसच्या उमेदवार यादीत दिलीप माने यांचे नाव देखील आले होते. मात्र, दिलीप माने यांना काँग्रेसने एबी फॉर्म दिला नाही. दिलीप माने यांना काँग्रेसने एबी फॉर्म न दिल्याने माने समर्थकांचा मोठा संताप व्यक्त केला आहे. प्रणिती शिंदे आणि काँग्रेसने मोठा दगफटका केल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे.  अनेक कार्यकर्त्यांचा डोळ्यात अश्रू, दिलीप माने याने अपक्ष फॉर्म मागे घेऊ नये.  काँग्रेसला याचे परिणाम भोगावे लागतील,  अशा संतप्त भावना दिलीप माने यांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या आहेत.  


इतर महत्त्वाच्या बातम्या 


Ajit Pawar on Jayant Patil : करेक्ट कार्यक्रम करायचं त्याच्या हातात नाही, इस्लामपुरात अजितदादांचा जयंत पाटलांवर हल्लाबोल


Devendra Fadnavis on Sharad Pawar : या वयात इतके खोटे बोलायचे नसते, देवेंद्र फडणवीसांचे शरद पवारांना जशास तसं प्रत्युत्तर