Amol Mitkari : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी अद्याप भाजपमध्ये (BJP) अधिकृतरित्या पक्षप्रवेश केलेला नसला तरी अशा बातम्या सध्या सुरू आहेत. बऱ्याच दिवसांपासून तुतारी गटामध्ये जे दोन नेते आहेत त्यांच्या गुंडागर्दीला एकनाथ खडसे हे कंटाळले होते. गेल्या काही दिवसांपासून ते दबावामध्ये होते, अस्वस्थ होते, ईडी, सीबीआयचा धाक त्यांना दाखवण्यात आला, असे बातम्यांमध्ये जरी सांगण्यात येत असले तरी मी चॅलेंज देऊन सांगतो की, तुतारी गटातले दोन नेते ज्यांच्या गुंडागर्दीमुळे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) फुटला आणि जे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपवण्याच्या तयारीत आहे, त्या जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आणि बाल मित्र मंडळाचे अध्यक्ष रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या त्रासाला कंटाळून नाथाभाऊंनी हा कठोर निर्णय घेतलाय, असा थेट आरोप राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरींनी (Amol Mitkari) केला आहे.


नाथाभाऊ जर आज असा निर्णय घेऊन स्वगृही जात असतील तर ईडी, सीबीआय किंवा तश्या गोष्टीचा धाक आहे, असे म्हणता येणार नाही. जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार या दोन गुंडांनी गुंडागर्दी करून एकनाथ खडसे यांना पक्षाबाहेर काढले असल्याचेही अमोल मिटकरी म्हणाले. 


हर्षवर्धन पाटील, विजय शिवतारे महायुतीच्या आदेश पाळतील 


शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी काही दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता. मात्र, अलीकडे त्यांचा हा राग मावळला असून ते आता मतदारसंघात राष्ट्रवादीचा प्रचार करताना दिसत आहे. याबाबत अमोल मिटकरी यांना विचारले असता ते  म्हणाले की, महायुती मधील सर्व पक्षानी एक दिलाने काम करण्याचे ठरवले आहे. विजय शिवतारे यांनी गेल्या काही दिवसांमध्ये जे वक्तव्य केले,  त्या वक्तव्यांच्या तोडीस तोड उत्तर आम्ही देखील दिले आहे. त्यानंतर अनेकांनी त्यांची समजूत काढली. मात्र, तरीही त्यांनी वक्तव्य करणे सोडले नाही. अखेर याबाबत जेव्हा स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करून त्यांची समजूत काढली. 


त्याचप्रमाणे हर्षवर्धन पाटील हे देखील मध्यंतरी विरोधाची भूमिका घेताना दिसत होते, माझ्या माहितीप्रमाणे येत्या 11 तारखेला सासवड येथे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सभा पार पडणार आहे. या ठिकाणी विजय शिवतारे असतील किंवा हर्षवर्धन पाटील असतील त्यांना समन्वयाच्या भूमिकेतून महायुतीने आदेश दिले आहेत आणि मला विश्वास आहे की ते या आदेशाचे उल्लंघन करणार नाहीत. प्रामाणिकपणे ते या आदेशाचे पालन करतील. असा विश्वास अमोल मिटकारीं बोलताना व्यक्त केलाय. तसेच बारामती लोकसभा ही आम्ही तब्बल दोन लाखाहून अधिक मतांनी जिंकून येऊ असेही अमोल मिटकरी म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या