Maharashtra Winter Session Nagpur 2025: एफडीएच्या कामावर सत्ताधारी भाजपचेच आमदार नाराज, विक्रमसिंह पाचपुतेंनी एफडीएचे टोचले कान
Maharashtra Winter Session 2025: विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार २९३ च्या प्रस्तावावर भाषण करत आहेत. आज सरकारकडून या भाषणांवर प्रतिउत्तर दिला जाणार असून आरोप-प्रत्यारोपाची शक्यता आहे.
LIVE

Background
Maharashtra Winter Session Nagpur 2025: नागपुरमध्ये सुरु असणाऱ्या हिवाळी अधिवेशनाचा आज पाचवा दिवस (Maharashtra Winter Session Nagpur 2025) आहे. विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार २९३ च्या प्रस्तावावर भाषण करत आहेत. आज सरकारकडून या भाषणांवर प्रतिउत्तर दिला जाणार असून आरोप-प्रत्यारोपाची शक्यता आहे. यावेळी अशासकीय ठराव चर्चेत येणार आहेत, ज्यामुळे सरकारला त्यांना मागे घेण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. (Maharashtra Winter Session Nagpur 2025)
विविध मागण्यांसाठी दिव्यांगांचे आंदोलन
नांदेड: प्रहार संघटनेतर्फे आज विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले. लोकप्रतिनिधींच्या निधीतून दिव्यांगांना निधी देण्यात यावा, या प्रमुख मागणीसह इतर चार मागण्यांसाठी ही धरणे आंदोलन करण्यात आले. आजचे आंदोलन हे केवळ धरणे आंदोलन आहे. पण, आमच्या मागण्या मान्य न केल्यास भविष्यात मोठे आंदोलन केले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
एफडीएच्या कामावर सत्ताधारी भाजपचेच आमदार नाराज, विक्रमसिंह पाचपुतेंनी एफडीएचे टोचले कान
एफडीएच्या कामावर सत्ताधारी भाजपचेच आमदार नाराज
भर सभागृहात आमदार विक्रमसिंह पाचपुतेंनी एफडीएचे टोचले कान
एफडीएच्या थातूरमातूर कारवाईचे काढले वाभाडे
कफ सिरफमुळे झालेल्या २५ बालकांच्या मृत्यू कडे वेधले लक्ष
अजित पवारांनी २०० कोटींची घोषणा करून दिले फक्त ३० कोटी
शासन गंभीर नसल्याची सुधीर मुनगंटीवार यांची टीका
शब्द देऊन पैसे देत नाहीत - मुनगंटीवार
बिंदू नामावली मध्ये सुधारणेच्या दृष्टीकोनातून एकही पाऊल नाही
फक्त ९० अधिकाऱ्यांच्या नावावर सुरु आहे कारभार
नवीन अधिकारी प्रशिक्षण घेऊन ही नियुक्तीच्या प्रतिक्षेत
मंत्री नरहरी झिरवळ यांनीच दिली एफडीएच्या ढिसाळ नियोजनाची कबुली























