Maharashtra Vidhansabha Election : "जरं एखाद्यावर आरोप करायचे असतील तर तुम्हाला पुरावे द्यावे लागतात. पण आतापर्यंत कोणतीही पुरावे यांनी दिलेले नाहीत. मारकडवाडीमध्ये जी चाचणी करणार होतात त्याची क्रेडिबिलीटी काय होती? Evm वर ज्याला मतदान केलं त्यालाच बॅलेटवर मतदान केलं गेलं याची काय खात्री? लोकांचा प्रशासनावर विश्वास नाही असं नाहीये. जर प्रशासनावर विश्वास नसता तर बांगलदेश सारखी परिस्थिती झाली असती", असं सोलापूरचे जिल्हाधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले. ते सोलापुरातील पत्रकार परिषदेत बोलत होते.
कुमार आशीर्वाद म्हणाले, जरं ग्रामस्थांना निकालावर संशय असेल तर ते कोर्टात निवडणूक याचिका दाखल करू शकतात. पण स्वतः असं मतदान घेता येणार नाही. पोलीस नीट काम करत नाहीत म्हणून स्वतःचे तुरुंग किंवा फोर्स सुरु करता येतं नाही. सर्व लोकांवर गुन्हा दाखल करून प्रश्न सुटणार नाहीयेत. काही दिवसांनी नायब तहसीलदार, तहसीलदार हे मारकडवाडीमध्ये जाऊन लोकांचे प्रबोधन करतील. जरं कोणी अफ़वा पसरवण्याचे कामे करणार असेल तर त्या विरोधात आम्ही करू. आज जरं असं काही झालं असेल तर त्याची चौकशी करून कारवाई करू.
पुढे बोलताना कुमार आशीर्वाद म्हणाले, Evm मशीन ज्या गाडीतून नेण्यात आले त्या गाडीना gps होते. इतकंच नाही तर evm मशीन नेणाऱ्या गाडयांना फॉलो करण्याची मुभा देखील होती. विविध राजकीय पक्षाच्या प्रतिनिधी समोर हे मशीन अकलूज गोडाऊनमध्ये ठेवले. 9 तारखेला evm मशीन पेअरिंग केली, त्यात ही राजकीय पक्षाचे उपस्थित प्रतिनिधी होते. 11 तारखेला कमिशनिंग झालं तेव्हा उत्तम जानकर यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. (कमीशिंग प्रोसेस कशी होते हे तांत्रिकरित्या सांगितलं)20 नोव्हेंबरला मतदान झालं, मारकडवाडी मध्ये तीन केंद्र आहे. 96 नंबर बूथ मध्ये 4 पोलिंग एजंट उपस्थित होते. 97 नंबर मध्ये 4 पोलिंग एजन्ट, 98 3 उपस्थित होते. यामध्ये ज्यांनी आक्षेप घेतलेत त्यांचे प्रतिनिधी देखील मॉक पोल वेळी उपस्थित होते. मॉक पोल सर्टिफिकेट आम्ही घेतो तेव्हा पोलिंग एजंटचे सही आम्ही त्यांच्यावर घेतो, या एजंटनी सही केलेली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या