Election Commission Officer on Markadwadi : मारकडवाडी (Markadwadi) येथील ग्रामस्थांनी काही दिवसांपूर्वी ईव्हिएमवर संशय व्यक्त करत बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यासाठी आग्रह केला होता. दरम्यान, त्यानंतर कायदेशीरदृष्ट्या ही मागणी पूर्ण करता येणार नाही, असं म्हणत प्रशासनाने ही मागणी धुडकावून लावली होती. मात्र, त्यानंतर मारकडवाडीतील (Markadwadi) लोक निवडणूक घेण्यावर ठाम राहिले आणि निवडणूक घेण्याचे नियोजन देखील केले. मात्र, प्रशासनाने या गावात जमावबंदी लागू करत निवडणूक होऊ दिली नाही. त्यावर विरोधी पक्षाने जोरदार टीका केली होती. अखेर बॅलेट पेपरवर निवडणूक का होऊ दिली नाही? याबाबत सोलापूरचे (Solapur) जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी (Election Commission Officer) कुमार आशीर्वाद यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
कुमार आशीर्वाद म्हणाले, 29 तारखेला मरकडवाडी ग्रामस्थांनी निवेदन दिलं. ज्यामध्ये निर्णय आम्हाला मान्य नसल्याचे सांगत बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची विनंती केली. पण नियमानुसार केवळ निवडणूक आयोगाला आणि त्यांच्यावतीने प्रशासनाला अधिकार आहेत. बाकी कोणाला कोणत्याही कायद्यानुसार अधिकार देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे त्यांचे निवेदन अमान्य करण्यात आले. तरी देखील ग्रामस्थ स्वतः मतदान करण्याचा निर्णय घेतला. आम्ही 2 ते 5 डिसेंबर पर्यंत जमावबंदी लागू केली होती. त्याचे उलंघन केले म्हणून 89 लोकांवर गुन्हे देखील दाखल केले आहेत. मारकडवाडी येथे मतदान का करू दिलं नाही? असा प्रश्न सध्या आहे. लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 नुसार कोणालाच मतदान घेण्याचे अधिकार नाहीत. जरं ग्रामस्थांना निकालावर संशय असेल तर ते कोर्टात निवडणूक याचिका दाखल करू शकतात. पण स्वतः असा मतदान घेता येणार नाही. पोलीस नीट काम करतं नाहीत म्हणून स्वतःचे तुरुंग किंवा फोर्स सुरु करता येतं नाही. त्याचं पद्धतीने स्वतः असं मतदान घेता येणार नाही.
पुढे बोलताना आशीर्वाद म्हणाले, 1 ते 31 ऑगस्ट FLC फर्स्ट लेव्हल चेकिंग करण्यात आले. राजकीय पक्षाचे प्रतिनिधी समोर हे करण्यात येतं.
प्रत्येक बॅलेटवर 96 मतदान करण्यात येतं, प्रत्येक बटन 6 वेळा दाबण्यात येतात. वेगवेगळ्या पद्धतीने हे चाचणी करण्यात येते या सर्वांची व्हिडीओ पुरावे उपलब्ध आहेत. त्यानंतरच हे मशीन अकलूजला पाठवण्यात आले आहेत.
Evm मशीन ज्या गाडीतून नेण्यात आले त्या गाडीना gps होते. इतकंच नाही तर evm मशीन नेणाऱ्या गाडयांना फॉलो करण्याची मुभा देखील होती. विविध राजकीय पक्षाच्या प्रतिनिधी समोर हे मशीन अकलूज गोडाऊनमध्ये ठेवले. 9 तारखेला evm मशीन पेअरिंग केली, त्यात ही राजकीय पक्षाचे उपस्थित प्रतिनिधी होते. 11 तारखेला कमिशनिंग झालं तेव्हा उत्तम जानकर यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 20 नोव्हेंबरला मतदान झालं, मारकडवाडीमध्ये तीन केंद्र आहेत. 96 नंबर बूथ मध्ये 4 पोलिंग एजंट उपस्थित होते. 97 नंबर मध्ये 4 पोलिंग एजन्ट, 98 3 उपस्थित होते. यामध्ये ज्यांनी आक्षेप घेतलेत त्यांचे प्रतिनिधी देखील मॉक पोल वेळी उपस्थित होते. मॉक पोल सर्टिफिकेट आम्ही घेतो तेव्हा पोलिंग एजंटचे सही आम्ही त्यांच्यावर घेतो, या एजंटनी सही केलेली आहे, असंही आशीर्वाद यांनी सांगितलं.
इतर महत्त्वाच्या बातम्या
Maharashtra Ekikaran Samiti : कन्नडिगांची दडपशाही, मराठी भाषकांचा महामेळावा दडपण्यासाठी बेळगावात पाच ठिकाणी जमावबंदी