Mumbai: लोकसभा निवडणुकीनंतर आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाचे प्रमुख नेते आता मैदानात उतरतायत. उद्यापासून तीन दिवस भाजपमधील सर्व प्रमुख नेते राज्यात विभागनिहाय दौरे करणार आहेत. लोकसभा निवडणुकीला अवघा एक महिना उलटून गेल्यानंतर विधानसभेसाठी भाजपने रणशिंग फुंकले आहेत. नुकतेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपचे पुण्यात महासंमेलन झाल्यानंतर आता विधानसभेच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रमुख नेते विभागनिहाय आढावा घेणार आहेत.


कोकण व ठाणे विभागात तीन दिवस दौरा


राज्यात कोकण आणि ठाणे विभागात भाजपचे नेते रवींद्र चव्हाण उद्यापासून तीन दिवस दौऱ्यावर राहणार असून या दोन्ही विभागांचा आढावा घेतला जाणार आहे. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर कोणत्या उमेदवारांना पंसती दिली जाईल याचा आढावा घेतला जाणार आहे.


उत्तर महाराष्ट्रामध्ये गिरीश महाजनांसह राधाकृष्ण विखे पाटील


विधानसभेच्या पार्श्वभूमीवर उत्तर महाराष्ट्रात भाजपचे दोन नेते तीन दिवसीय दौरा करणार  आहेत. गिरीश महाजन आणि राधाकृष्ण विखे पाटील या दोन भाजप नेत्यांचा दौरा आखण्यात आल्याची माहिती समोर येतेय. विधानसभा निवडणुकांसाठी उत्तर महाराष्ट्रातून कोणत्या उमेदवारांना पसंती दिली जाईल यासह या विभागाचा थोडक्यात आढावा घेण्यात येणार आहे.


विधानसभेच्या तयारीसाठी राज्यात मंथन बैठका चर्चासत्र आणि प्रभारी बैठक आहे आता झाल्या आहेत. दरम्यान विधानसभेच्या तयारीसाठी भाजपने शड्डू ठोकला असून नुकत्याच झालेल्या पुण्यातील महासंमेलनात गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभा निवडणुकीची सर्व कसर आता विधानसभेच्या निवडणुकीत भरून काढण्याचे आदेश राज्यातील भाजप नेत्यांना दिले आहेत.


पुढील ३० वर्षे भाजपचे सरकार


बाजीराव पेशवा आणि बाळगंगाधर टिळक यांच्या या पुण्यनगरीमध्ये सांगतो आहे, आत्ता तर फक्त 10 वर्षे पुर्ण झाली आहेत. पुढचे ३० वर्ष भाजपचे सरकार या देशात येईल. आपल्यातील आत्मविश्वासाला जागरूक करण्याची गरज आहे. आपल्यातील मतभेद दूर करण्याची गरज आहे. महान भारताची रचना ही केवळ भाजपचं करू शकते. याच आत्मविश्वासासह पुढे जायचं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) देशीतील गरीब नागरिकांना घरे दिली, शौचालये दिली, गॅस सिलिंडर दिले, वीज दिली. गरीबांना अन्नधान्य दिलं, ५ लाखापर्यंत विमा दिला. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस लाडकी बहीण योजना, आणि लाडका भाऊ योजना देत आहेत. गरीब कल्याणांचं कोणताही काम काँग्रेस पक्ष करू शकत नाही किंवा त्यांचा कोणता मित्रपक्ष हे काम करू शकतो. गरिब कल्याणचं काम हे फक्त भाजपचं करू शकते, असं म्हणत अमित शाहांनी (Amit Shah) काँग्रेसवर हल्लाबोल करत पुढील 30 वर्षे भाजपची सत्ता देशात येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे..


हेही वाचा:


Amit Shah: शाहांनी विधानसभा निवडणुकीचा ठोकला शड्डू; म्हणाले 'राज्यात बहुमताचं सरकार अन् देशात आणखी ३० वर्षे राहणार'