मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी नागपूरमध्ये बोलताना स्वबळाचा नारा दिला. यावर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेचे दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभा आणि विधानसभेला स्वबळाची आवश्यकता होती. आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना महापालिका, जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीमध्ये संधी द्यायची असते. कार्यकर्त्यांना संधी द्यायची असेल आणि त्रांगड होत असेल तर अडचणी निर्माण होत असतील तर स्वावलंबी व्हावं. स्वबळावर लढावं, संजय राऊत यांची भूमिका निश्चितच स्वागतार्ह आहे, असं अरविंद सावंत म्हणाले.
आमच्याकडे काही शिवसैनिक म्हणतात एकटे लढलो असतो तर 20 पेक्षा अधिक आलो असतो असं म्हणतात. उद्धव ठाकरे एकटे होते, युती तुटली होती, कोणी बरोबर नव्हते. आठवले, जानकर सोडून गेले होते, विधानसभा निवडणुकीत एकटं लढल्यानंतर 63 आमदार निवडून आले होते. तो अनुभव गाठिशी आहे. निश्चितपणे लोकांमध्ये उद्धव ठाकरेंबद्दल लोकांमध्ये सद्भाव आहे. एकटं लढलं की अनेक प्रश्नांची उत्तरं मिळतात, असं अरविंद सावंत म्हणाले.
शिवसेनेची ताकद अगोदरपासून होती.शिवसेना महापालिकेवर 1985 पासून राज्य करतेय. भाजपसोबत देखील अनेकदा युती झाली नव्हती. मराठी माणसाचं अस्तित्व,अस्मिता, महाराष्ट्राचा धर्म आज बुडित आहे. सारंच विकलं गेलं आहे. सारंच विकलं गेलं आहे. भ्रष्टाचार टोकाचा आहे. मराठी माणसाच्या अस्तित्वाला, अस्मितेला धक्का लावण्याचा प्रयत्न सत्ताधारी आणि विरोधकांकडून होत असतो त्याला आव्हान देण्याची गरज आहे. ती महापालिकेच्या निवडणुकीत मराठी माणसांचा धर्म दाखवणं आवश्यक आहे, असं अरविंद सावंत म्हणाले.
संजय राऊतांचा स्वबळाचा नारा
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढणार असं संजय राऊत यांनी स्पष्टपणे जाहीर केले. इतर पक्षांनी पण कार्यकर्त्यांसाठी स्वबळावर निवडणूक लढवावी असा सल्लाही त्यांनी दिला.
नागपूर पासून मुंबई पर्यंत आम्ही स्वबळावर लढणार आहोत.एकदा आम्हाला पाहायचं आहेच, जे काही होईल ते होईल. आमचं असं ठरतंय की मुंबई,ठाणे नागपूर मध्ये कार्यकर्त्यांना संधी केव्हा देणार याचा विचार करावा लागेल. कार्यकर्त्यांना संधी न दिल्यामुळे पक्ष वाढीला फटका बसतो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सर्व पक्षांनी स्वबळावर लढवाव्या आणि आपापल्या कार्यकर्त्यांना संधी द्यावी, असं संजय राऊत म्हणाले. राजकारणात कुणीही कुणाचा कायमचा शत्रू मित्र नसतो. राजकारणात काही असंभव नसतं, असं संजय राऊत म्हणाले.
इतर बातम्या :